नांदेड | १६.२ | रयत समाचार
(Literature) २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नांदेड येथे होणाऱ्या २० व्या अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला असून संमेलनाच्या निधीसाठी बँक खात्याचा क्युआर कोड अधिकृतपणे उपलब्ध करण्यात आला आहे. या क्युआर कोडचे लोकार्पण संमेलनाच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
(Literature) विद्रोही साहित्य संमेलन ही परंपरा लोकसहभाग आणि लोकनिधीवर उभी आहे. शोषणविरोधी, समतावादी, बुद्धिवादी, विज्ञानवादी आणि परिवर्तनवादी विचारांची मांडणी करणारे हे संमेलन कोणत्याही सत्ताकेंद्रांच्या आश्रयावर नव्हे, तर सर्वसामान्य नागरिकांच्या योगदानावर उभे राहते, ही त्याची खास ओळख आहे.
(Literature) यंदाच्या संमेलनासाठीही लोकनिधी संकलनाची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ व्हावी यासाठी बँक खात्याचा क्युआर कोड प्रसारीत करण्यात आला आहे. इच्छुक नागरिकांना या क्युआर कोडच्या माध्यमातून थेट विद्रोही साहित्य संमेलनाच्या अधिकृत बँक खात्यावर निधी जमा करता येणार आहे.
संयोजन समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे की, देशातील सर्व शोषणविरोधी, समतावादी आणि परिवर्तनवादी विचारांचे भारतीय नागरिकांनी या उपक्रमाला सढळ हाताने आर्थिक पाठबळ द्यावे. “विद्रोहीचा आवाज बुलंद राहावा, विचारांची मशाल अधिक तेजाने पेटती राहावी, यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक आहे,” असे मत समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले.
संमेलनाच्या तयारीसाठी विविध समित्यांचे काम सुरू असून साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. नांदेडमध्ये होणारे हे विद्रोही संमेलन विचारांच्या देवाणघेवाणीचे आणि परिवर्तनवादी चळवळीला नवे बळ देणारे ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘इसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
