Press | उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्पर्धा जाहीर; प्रवेशिकांसाठी 15 मार्चपर्यंत मुदत

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | १४.२ | रयत समाचार

(Press) राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत पत्रकार, लेखक, छायाचित्रकार व समाजमाध्यम प्रतिनिधींसाठी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाजमाध्यम तसेच स्वच्छता अभियानाविषयी जनजागृतीपर लेखनासाठी हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

(Press) या स्पर्धेसाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन, छायाचित्रे व वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम तारीख १५ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

(Press) राज्यातील विविध जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावेत. तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्पर्धकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२ येथून अर्ज मिळवावेत.
स्पर्धेचे अर्ज नमुने व सविस्तर माहिती https://dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे महासंचालनालयाने कळविले आहे.

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘इसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

Literature | प्राचीन मराठी भाषेतील जैनांच्या योगदानाचा वाचनीय धांडोळा – डॉ. महावीर अक्कोळे


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading