अहमदनगर | १४ मार्च | प्रतिनिधी
(Education) व्यावहारिक ज्ञान समजण्यासाठी बालआनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खरेदीविक्रीचा अनुभव देणे खूप चांगली गोष्ट असल्याचे प्रतिपादन प्रा. विजय शिंदे यांनी केले. नगर तालुक्यातील पारगाव भातोडी येथील डॉ. शरद कोलते इंग्लिश मिडीयम स्कूलच्यावतीने बालआनंद मेळावा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी रावसाहेब दळवी, अशोक शिंदे, उद्योजक विकास गुंड, विजय लांडगे, संदीप पुंड, प्रशांत आबा गुंड, शेराली मुलानी, मुजुफ खान, परमेश्वर गुंड, विशाल गुंड, भारत गुंड पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Education) विद्यार्थ्यांनी यावेळी अनेक खाद्यपदार्थ, भाजीपाला, फळे, पाणीपुरी, भेळ, इडली, लस्सी असे अनेक पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थांना अशा प्रकारचा अनुभव मिळाल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास नक्कीच मदत होते. महिलादिनाचे औचित्य साधून सर्व महिला शिक्षिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. वस्तू खरेदी करून पालकांनी मुलांच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.
(Education) कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ईश्वर तनपुरे, सुनिता तनपुरे, रेश्मा शेख, स्वाती वायकर, कीर्ती मगर, निकिता तनपुरे आदींना विशेष प्रयत्न केले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.