शेवगाव | १८ जानेवारी | लक्ष्मण साळुंके
(sports) नांदेड महाराष्ट्र येथे ता. १३ जानेवारी रोजी झालेल्या ६८ व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेमध्ये आबासाहेब काकडे विद्यालयाचा खेळाडू युवराज महादेव मांडकर याने महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करत नेत्रदीपक कामगिरी केली. छत्तीसगड संघाला ६-१ अशा फरकाने पराजित करून सुवर्णपदक मिळविले.
(sports) राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा ता. १३ जानेवारी ते १७ जानेवारी २०२५ या दरम्यान नांदेड महाराष्ट्र येथे संपन्न झाल्या.या यशस्वी खेळाडूला क्रीडा शिक्षक कल्पेश भागवत,संतोष ढोले, सचिन वाल्हेकर, विक्रम घुटे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी खेळाडूचे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष डॉ.ॲड.विद्याधरजी काकडे साहेब, जि.प.सदस्या हर्षदा काकडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रा. लक्ष्मण बिटाळ, विश्वस्त पृथ्वीसिंग काकडे, शालेय शिक्षण विभाग प्रमुख वंदना पुजारी, सहप्रमुख अशोक आहेर,अहिल्यानगर जिल्हा बेसबॉल संघटनेचे सचिव मकरंद कोऱ्हाळकर, अध्यक्ष अरुण चंद्र, उपाध्यक्ष सुधीर चपळगावकर, विद्यालयाचे प्राचार्य संपत दसपुते, उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड, उपप्राचार्या रूपा खेडकर,पर्यवेक्षक सुनिल आव्हाड,हरिश्चंद्र मडके,शिवाजी पोटभरे तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनींनी व पालकांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा