ग्रंथपरिचय | ३०.४ | रयत समाचार
कांचा आइलैय्या यांच्या ‘मडकी घडवताना जमीन कसताना’ या पुस्तकातून श्रमाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. मराठी अनुवाद आता सवलतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. अन्न तयार करणारा शेतकरी, मडकी बनवणारा कुंभार आणि दूध देणारा पशुपालक हेच समाजाचे खरे निर्माते असल्याचा ठाम संदेश या पुस्तकातून दिला आहे.
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा असल्या तरी त्या हवेतून निर्माण होत नाहीत, तर त्या प्रत्येकाच्या श्रमातून घडतात. मानवी जीवनातील प्रत्येक गरज ही कोणाच्या ना कोणाच्या कष्टांची देणगी आहे. त्यामुळे लहान वयापासूनच मुलांच्या मनावर श्रमाची जाणीव आणि त्याचा सन्मान बिंबवणे अत्यंत गरजेचे आहे.
घरातील साधी कामे, स्वतःची जबाबदारी आणि हाताने काम करण्याची सवय यांमधून मुलांमध्ये श्रमाबद्दल आदर निर्माण होतो. मात्र, सध्याच्या समाजव्यवस्थेत श्रम करण्यास प्रोत्साहन दिले जात नाही, तसेच श्रमाचा सन्मानही शिकवला जात नाही, ही खंत व्यक्त केली जाते.
या पुस्तकाचा मराठी लातुरचे अनुवाद सुभाष भिंगे यांनी केला असून, प्रकाशन हरिती प्रकाशन यांनी केले आहे. पेपरबॅक स्वरूपातील हे पुस्तक १०३ पृष्ठांचे असून त्याची किंमत २५० रुपये आहे. मात्र, प्रकाशनपूर्व विशेष ऑफर अंतर्गत हे पुस्तक २०० रुपयांत (पोस्टेजसह) उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पुस्तकाची आगाऊ नोंदणी करण्याची अंतिम तारीख १ मे २०२६ असून इच्छुकांनी खालील संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
अधिक माहिती व पुस्तकासाठी राहुल लोंढे- 7385521336 (GPay/PhonePe उपलब्ध)
बसवंत, पुणे- 89560 80218 (GPay/PhonePe उपलब्ध) संपर्क साधावा.
पुस्तकासाठी पेमेंट केल्यानंतर पावतीसह आपले नाव व पत्ता संबंधित व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावा, असे कळविण्यात आले आहे.
श्रमाचे महत्त्व समजून घेतल्याशिवाय समाज समजत नाही, आणि समाज समजल्याशिवाय खरी प्रगती साध्य होत नाही. त्यामुळे हे पुस्तक स्वतः वाचावे, मुलांना वाचायला द्यावे आणि शाळांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
