Goa Karmali | आदिवासी खाद्यपदार्थ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ज्येष्ठ नटसम्राट भालचंद्र उसगांवकर यांच्या हस्ते उद्घाटन

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

करमळी, गोवा | २९.४ | रयत समाचार

(Goa Karmali ) येथील हेल्पिंग हॅन्ड्स फाऊंडेशन आणि आदिवासी कल्याण संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदिवासी खाद्यपदार्थ विक्री प्रदर्शनाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री कमलावती देवस्थानच्या सभागृहात हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. उन्हाळी शिबिराच्या पार्श्वभूमीवर उद्योग आधार योजनेअंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

(Goa Karmali) कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नटसम्राट भालचंद्र उसगांवकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी कला व संस्कृती खात्याचे अधिकारी व नाट्यकर्मी प्रेमानंद कलशांवकर, आदिवासी कल्याण खात्याचे अधिकारी दत्तराम तारी, तसेच रामदास पर्वतकर, पुंडलीक धुळापकर, उज्वला नाईक, सनिपा अडकोणकर आणि संस्थेच्या अध्यक्षा नमिता दिनेश उसगांवकर उपस्थित होत्या.

(Goa Karmali) मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आपल्या भाषणात उसगांवकर यांनी सांगितले, अशा उपक्रमांमुळे अनुसूचित जमातीतील लोकांना स्वावलंबी होण्यासाठी प्रभावी व्यासपीठ मिळते. आदिवासी कल्याण खात्याच्या योजनांमुळे वंचित घटकांना मोठा आधार मिळत असून, टीकेपेक्षा कृतीला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी दत्तराम तारी यांनी विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. प्रदर्शनातील विविध पारंपरिक खाद्यपदार्थांना ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विंदीया गावस यांनी केले. नमिता उसगांवकर यांनी स्वागत केले, तर आभार प्रदर्शन चिदानंद मडकईकर यांनी मानले. कार्यक्रमानंतर रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading