प्रशांत बुऱ्हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याची भेट

अहमदनगर (प्रतिनिधी) १७.६.२०२४

येथील जय बजरंग युवा सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक मंडळाच्या वतीने उद्योजक प्रशांत बुऱ्हाडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रमिकनगर भागातील गरजूवंत मुलांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाध्यक्ष माजी नगरसेवक नितीन शेलार, प्रशांत बुऱ्हाडे, बंटी डापसे, वैभव झोटिंग, गणेश कुसाळकर, महेंद्र कुसाळकर, लखन शिंदे, धतेंद्रा गाडे, कैलास गर्जे, प्रतीक सोनवणे, प्रशांत उरुणकर, चिन्मय पंडित आदींसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
शेलार यावेळी बोलताना म्हणाले, गेली १५ वर्षे सामाजिक कार्य करत असून वेळोवेळी विविध उपक्रम राबवित असते. सराफ व्यावसायिक प्रशांत बुऱ्हाडे यांच्या वाढदिवसानिम्मित गरजू मुलांना वह्या, पुस्तके, दप्तर, जेवणाचा डबा आदी वस्तू भेट देण्यात आल्या.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *