World news | शुभम सुतार यांची शिल्पकृती झळकणार लंडनमध्ये; The Quiet Warmthची आंतरराष्ट्रीय निवड

राजर्षी शाहूंच्या कलानगरीचा पुन्हा एकदा गौरव

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

कोल्हापूर | २०.३ | रयत समाचार

(World news) येथील कला क्षेत्राची अभिमानाची बातमी समोर आली आहे. येथील तरुण शिल्पकार शुभम गंगाधर सुतार यांच्या The Quiet Warmth या शिल्पकृतीची प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शिल्पप्रदर्शनासाठी निवड झाली. त्यांच्या या कलाकृतीचा समावेश FACE 2026- Society of Portrait Sculptors आयोजित वार्षिक प्रदर्शनात करण्यात आला. त्यांचे गंगाधर आर्ट स्टुडीओ प्रसिद्ध आहे.

(World news) हे बहुप्रतिक्षित प्रदर्शन इंग्लंडमधील लंडन येथील ऐतिहासिक The Garrison Chapel येथे ता. १३ एप्रिल ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत भरणार आहे. जगभरातील निवडक आणि दर्जेदार कलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात सादर केल्या जाणार असून, त्यात राजर्षी शाहूंच्या कलानगरी कोल्हापूरच्या कलाकाराची निवड होणे ही विशेष अभिमानाची बाब मानली जात आहे.

(World news) शुभम गंगाधर सुतार हे पोर्ट्रेट आणि फिगरेटिव्ह शिल्पकलेत कार्यरत असून, मानवी भावना, व्यक्तिमत्त्व आणि सूक्ष्म तपशील अत्यंत वास्तववादी पद्धतीने साकारण्यात त्यांची खास ओळख आहे. The Quiet Warmth या शिल्पकृतीत त्यांनी मानवी भावविश्वातील शांतता, आपुलकी आणि उबदारपणाचा प्रभावी कलात्मक आविष्कार साकारला.

या आंतरराष्ट्रीय निवडीमुळे राजर्षी शाहूंनी विकसित केलेल्या कोल्हापूरच्या कला क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, कला रसिक आणि कलाकारांकडून शुभम सुतार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निमित्ताने कोल्हापूरच्या शिल्पकलेला जागतिक स्तरावर नवा मंच मिळाला आहे.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading