World News | पुण्यात ‘द बॉक्स’ येथे 3 दिवसांचा चित्रपट महोत्सव; आनंद पटवर्धन यांच्या 'वसुधैव कुटूंबकम्'ने उद्घाटन - Rayat Samachar

World news | पुण्यात ‘द बॉक्स’ येथे 3 दिवसांचा चित्रपट महोत्सव; आनंद पटवर्धन यांच्या ‘वसुधैव कुटूंबकम्’ने उद्घाटन

जनसंवाद, पत्रकारीतेचे विद्यार्थी, चित्रपटप्रेमींना संधी

rayatsamachar
2 Min Read
SubEditor | Dioak Shirasath

पुणे | ८.३ | रयत समाचार

(World news) पुण्यातील एरंडवणे येथील द बॉक्स हब येथे १३ ते १५ मार्च दरम्यान तीन दिवसांचा विशेष चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सिनेमा कलेक्टिव्हच्या (Cinema Collective) वतीने आयोजित या कार्यक्रमात सामाजिक, राजकीय विषयांवर भाष्य करणारे पाच महत्त्वाचे चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.

- Advertisement -

(World news) महोत्सवाची सुरुवात जगप्रसिद्ध माहितीपट दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांच्या Vasudhaiva Kutumbakam – The World is Family या चित्रपटाने होणार आहे. हा चित्रपट शुक्रवारी ता.१३ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता प्रदर्शित होईल. आनंद पटवर्धन स्वतः उपस्थित राहून प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.

(World news) हा चित्रपट ‘संपूर्ण जग एक कुटुंब आहे’ या प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित असून आधुनिक काळातील बहुसंख्यवादी व विभाजनकारी विचारसरणींना प्रश्न विचारतो.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, ता. १४ मार्च रोजी दिग्दर्शक आर. व्ही. रमणी यांचा Oh That’s Bhanu हा चित्रपट सायंकाळी ५.३० वाजता, तर फरहा खातून दिग्दर्शित Holy Rights हा चित्रपट रात्री ८ वाजता दाखविण्यात येणार आहे.

१५ मार्च रोजी सुमिरा रॉय यांचा Bhangaar हा चित्रपट दुपारी १२ वाजता आणि समर्थ महाजन यांचा Borderlands हा चित्रपट दुपारी २ वाजता प्रदर्शित होणार आहे.

हा महोत्सव द बॉक्स हब, एसएनडीटी मेट्रो स्टेशनजवळ, एरंडवणे, पुणे येथे होणार असून तिकीट बुकिंग www.ticketkhidakee.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सामाजिक वास्तव, वैयक्तिक कथा आणि राजकीय संदर्भ यांचा वेध घेणारे हे चित्रपट पाहण्यासाठी जनसंवाद, पत्रकारीतेचे विद्यार्थी तसेच चित्रपटप्रेमींना ही एक महत्त्वाची संधी आहे.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading