नवी दिल्ली | २९ मार्च | प्रतिनिधी
(World news) ऑपरेशन ब्रह्मा: नावाने म्यानमारला मदत साहित्य सुपूर्द. मदत साहित्याचा पहिला माल यांगूनमध्ये राजदूत अभय ठाकूर यांनी औपचारिकपणे यांगूनचे मुख्यमंत्री यू सोए थेन यांना केला सुपूर्द.
(World news) ‘ऑपरेशन ब्रह्मा’ हा भारत सरकारने म्यानमारमध्ये नुकत्याच झालेल्या विनाशकारी भूकंपानंतर सुरू केलेला एक मदत उपक्रम आहे. या ऑपरेशन अंतर्गत, भारताने भूकंपग्रस्त म्यानमारला तातडीने मदत पुरवण्यासाठी पुढाकार घेतला. मदत सामग्रीची पहिली खेप यांगून येथे पोहोचली असून, भारतीय हवाई दलाच्या विमानांद्वारे आणखी मदत सामग्री पाठवली जात आहे.
(World news) हा उपक्रम भारताच्या ‘प्रथम प्रत्युत्तरदाता’ म्हणजेच First Responder या भूमिकेचा भाग आहे. ज्यामध्ये संकटग्रस्त देशांना त्वरित मानवीय मदत पुरवणे हा उद्देश आहे. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. ‘ऑपरेशन ब्रह्मा’ हे नाव भारतीय संस्कृतीतील सनातन वैदिक ब्राह्मणी धर्माच्या ‘ब्रह्मा’ या सर्जनकर्त्या देवतेच्या संदर्भातून प्रेरित आहे, जे नवनिर्माण आणि पुनर्बांधणीचे प्रतीक मानले जाते.
या ऑपरेशनद्वारे भारताने पुन्हा एकदा आपली जागतिक स्तरावरील मानवतावादी प्रतिबद्धता दर्शविली आहे, जशी यापूर्वी नेपाळ, श्रीलंका, मालदीव यांसारख्या देशांना संकटकाळात मदत केली होती.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.