(World news) भारत सरकारने ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ ठिकाणांना लक्ष्य केले आहे, तर पाकिस्तानच्या सरकारी टीव्हीने लष्कराच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे की, भारतीय सैन्यानं पाकिस्तानात तीन ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.
प्रतिक्रिया देताना संभाजी ब्रिगेडचे प्रदीप कणसे म्हणाले, नागरी वस्तीवर हल्ला न करता दहशतवादी स्थळावर हल्ले करून संपूर्ण जगाला आपल्या नैतिकतेचे दर्शन घडवणाऱ्या भारतीय जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन.
(World news) त्यांनी आपले नागरिक मारले तरीही पाकिस्तानी नागरिक/सैनिक न मारता फक्त दहशतवादी मारून युद्धाचे स्वरूप न देण्यात भारताचे मोठेपण आहे, अशी प्रतिक्रिया हेरंब कुलकर्णी यांनी दिली.
(World news) विश्वंभर चौधरी म्हणाले, भारतीय सैन्यदलानं अत्यंत नियंत्रित पण परिणामकारक हल्ले करून अतिरेक्यांना योग्य तो धडा दिला यासाठी लष्कराचं अभिनंदन. पाकिस्तानातील सामान्य नागरिक आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यावर हल्ले केलेले नाहीत असं लष्करानं स्पष्ट केलं आहे. दोषींना सोडायचं नाही आणि निरपराधांना मारायचं नाही ही भारतीय परंपरा आपल्या लष्करानं कायम राखली ही अभिमानास्पद बाब आहे. सैन्यदलाचं आणि सैन्यदलाला मोकळीक देणाऱ्या भारत सरकारचं अभिनंदन. थेट युद्ध होण्याची शक्यता कमी आहे पण समजा युद्धाचा निर्णय सरकारनं घेतलाच तर पक्षीय आणि व्यक्तिगत मतभेद विसरून भारतीय म्हणून सर्वांनी एक रहावं.
शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली, आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन!