World news | 16 व्या वर्षी किल्ला जिंकणारा राजा; जगप्रवाशी लिअम रिचर्डस् यांनी उलगडली छत्रपती शिवरायांची गाथा

2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | १२.४ | रयत समाचार

(World news) मुंबई विमानतळावर उतरताना प्रवाशांचे लक्ष वेधणारे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मात्र, अनेकांना त्यांच्या महान कार्याची सखोल माहिती नसल्याचे मत एका जगप्रवाशाने नुकतेच व्यक्त केले. आधुनिक जगप्रवासी लिअम रिचर्डस यांनी आपल्या सामाजिक माध्यमावर शिवचरित्राबद्दल माहिती, व्हिडीओ आणि छायाचित्रे शेअर करताना महाराजांच्या पराक्रमाचे प्रभावी वर्णन केले.

World news

(World news) रिचर्डस यांनी लिहिले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे असे योद्धे होते, ज्यांनी आयुष्यभर मुघलांविरुद्ध लढा देत अनेक डोंगरी किल्ले जिंकले आणि त्यांना अभेद्य दुर्गांमध्ये रूपांतरित केले. आजही हे किल्ले त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत.

(World news) त्यांनी पुढे नमूद केले की, शिवाजी महाराजांनी मराठ्यांचे स्वराज्य उभारले, एक हिंदवी साम्राज्य. राजगड किल्ला हा त्यापैकीच एक महत्त्वाचा किल्ला असून, अवघ्या १६ व्या वर्षी त्यांनी तो जिंकला, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. असे उदगार रिचर्डस, यांनी थेट रायगडावरूनच काढले आणि तेथील छायाचित्रे प्रसिद्ध केली.

World news

ही कथा इथेच संपत नाही, असे म्हणत रिचर्डस यांनी पुढील काही आठवड्यांत शिवाजी महाराजांच्या इतिहासावर अधिक माहिती देण्याचे संकेत दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख पून्हा एकदा जागतिक पातळीवर पोहोचत असल्याचे या पोस्टमुळे अधोरेखित झाले.

World newsलिअम रिचर्डस यांचा रायगडावरील व्हिडीओ पहाण्यासाठी येथे क्लिक करा

जगभरातील लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची जिज्ञासा असल्याने ते महाराष्ट्रात वेळोवेळी भेट देण्यास येत असतात, त्यापैकीच सध्या महाराष्ट्रात भटकंती करत असलेले लिअम रिचर्डस् एक आहेत.

History: The Indians: A Useful Reference Book for Scholars of South Asian History

Religion: Visit to Lourdes: A major Marian devotion centre

Share This Article