अहमदनगर | 11 एप्रिल | प्रतिनिधी
(Social) शहरातील नागापूर बोल्हेगाव उपनगर झपाट्याने विकसित होत आहे. या ठिकाणची लोकसंख्या जशी झपाट्याने वाढली तसेच अवैध धंद्यांचा सुळसूळाट झाला. यास प्रशासनाचा आशिर्वाद असल्याने सामान्य नागरिक, महिला, मुली जीव मुठीत धरून रस्त्याने जात असल्याचे चित्र दिसते. या परिसरात शाळा, महाविद्यालय, नर्सिंग कॉलेजसह होमिओपॅथिक महाविद्यालय असल्याने बाहेरगावच्या ग्रामीण भागातील शेतकरी व गरीबांच्या मुली होस्टेलला रहातात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
(Social) गांधीनगर पासून ते आंबेडकर चौक ते मनमाड रस्त्यापर्यंत देशी, गावठी दारू सर्रास विकली जाते? त्यासोबतच बिंगो, मटका, मावा टपऱ्या पोलिसांच्या नाकावर टिच्चून चालू आहेत. हे सर्व चालू असल्याचे पोलिस प्रशासनाला माहिती नाही हे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे.
(Social) एमआयडीसी-तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा भाग येतो. या ठिकाणावरून निंबळक, बोल्हेगाव, गांधीनगर, राजे संभाजी नगर, विशाल हनुमान नगर, शिवाजीनगर आखाडा, कळमकर नगर, नवनाथ नगरसह अनेक निवासी वसाहतीतील महिला मुली येतजात असतात. याच रस्त्यावरच पुढे एमआयडीसी, काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुल, सनफार्मा शाळा महाविद्यालय, रामराव चव्हाण विद्यालय असल्याने या रस्त्याला मोठ्या प्रमाणात विद्यार्थीनी, औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणाऱ्या महिला, शाळेतील मुलींची ये जा असते, परंतु रस्त्यालगत असणाऱ्या अवैध धंद्यांमुळे येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची, मुलींची छेड काढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात.
(Social) मागील पंधरा दिवसपूर्वी अतिक्रमण विभागाने या रस्त्यावरचे अतिक्रमण काढले होते. अतिक्रमण विभागाची कारवाई झाल्यानंतर अवैध धंद्याना आळा बसेल असे वाटत असतानाच कारवाई झाल्यानंतर दोन दिवसातच परत रस्त्याच्या बाजूला अवैध धंदे चालू करण्यात आले. त्यामुळे कारवाईचा हा फार्स कशासाठी? अशी परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा होती. अवैध धंदे पोलिस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन यांच्या आशीर्वादानेच चालू आहेत ! यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी परिसरातील महिला विद्यार्थींमधून होत आहे.
हे हि वाचा : health | मृत्युनंतर दुसऱ्यांना जीवनदान द्या, पुढाकार घेऊन अवयवदान करा; Toll-Free Number : 1800-11-4770
हे हि वाचा :Crime | एक्साईजचा ‘तोतया पीएसआय’ शिंदे याचा नगरकरांना फोन; छत्रपतींच्या नावाखाली दमदाटी
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.