‘मजबूती का नाम महात्मा गांधी’
वर्धा | ७ जुलै | प्रतिनिधी
(Social) अहमदनगरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व संवेदनशील लेखक हेरंब कुलकर्णी यांना यंदाचा ‘गिरीश गांधी सामाजिक राष्ट्रीय पुरस्कार’ सेवाग्राम, वर्धा येथील ऐतिहासिक सेवाग्राम आश्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
(Social) यावेळी बोलताना डॉ. अभय बंग यांनी सांगितले, हेरंबकडे प्रश्नाने अस्वस्थ होणारे संवेदनशील हृदय, तो प्रश्न मांडणारे प्रभावी लेखन आणि लेखनावर न थांबता उत्तर शोधणारी कृतीशीलता आहे. समाजकार्य करताना पुरस्कारामुळे त्या कार्याला समाजमान्यता मिळते. हेरंब यांच्या लेखनामुळे ‘एकल महिलांचा’ प्रश्न समाजाच्या चर्चेत आला आहे, ही मोठी गोष्ट आहे.
(Social) पुरस्कार स्वीकृत करताना हेरंब कुलकर्णी म्हणाले, आज दारिद्र्याचे प्रश्न समाजापर्यंत पोहोचवणे हेच कठीण झाले आहे. तरुणांना आणि मध्यमवर्गीयांना सामाजिक प्रश्नांविषयी संवेदनशील बनवणे हे मोठे आव्हान आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सी.मो. झाडे प्रतिष्ठानच्या भारती झाडे यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कार वितरणानिमित्त ‘मजबूती का नाम महात्मा गांधी’ या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये देशभरातून आलेल्या १२० तरुणांनी सहभाग घेतला.
हा सोहळा सेवाग्राम आश्रमाच्या पवित्र परिसरात पार पडल्याने त्याला एक वेगळेच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी वातावरण लाभले होते.
हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता
