Rip news | ज्येष्ठ पत्रकार पन्नालाल सुराणा यांचे निधन

उपसंपादक | दिपक शिरसाठ

सोलापूर | ०३.१२ | रयत समाचार

(Rip news) ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले. त्यांचे वय ९३ वर्ष होते. काल रात्री नळदुर्ग येथील ‘अपना घर’ येथे जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सुराणा यांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला असल्याने त्यांचा देह सरकारी रुग्णालयास दान करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Rip news
छायाचित्र – संदेश भंडारे

(Rip news) आयुष्यभर सामाजिक तसेच राजकीय कार्यासाठी त्यांनी वाहून घेतले होते. यासोबतच ते पत्रकारही होते. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता केली. मराठवाडा दैनिकाचे ते संपादक होते. शिक्षण, शेती, बेरोजगारी या विषयावर त्यांनी प्रचंड लेखन केले आहे.

(Rip news) सुमारे ७० वर्षे ते देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाच्या स्थितंतराचे साक्षीदार राहिले. चले जाव आंदोलनपासून ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत त्यानंतर स्वातंत्र्य ते आणीबाणी आणि त्यानंतर देशाच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीतील महत्वाचा वाटा राहिला.

जुना समाजवादी पक्ष, जनतापक्ष, अनेक पुरोगामी संघटना आणि जनआंदोलन यांच्या उभारणीमध्ये सुराणा यांचा मोलाचा वाटा आहे.

 

Share This Article