अहमदनगर | १७ मार्च | प्रतिनिधी
(Reservation) एसबीसी अन्याय निवारण कृती समितीची बैठक अहमदनगर येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याध्यक्ष सुरेश पद्मशाली तर जनरल सेक्रेटरी जितेंद्र कांचानी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, भ्रष्टाचारविरोधी जनांदोलन उपाध्यक्ष अशोक सब्बन, स्वकुळसाळी समाजाचे कार्यकर्ते दिलीप घुले तसेच पद्मशाली समाजातील भीमराज कोडम, रवी दंडी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
(Reservation) यावेळी बोलताना राज्याध्यक्ष सुरेश पद्मशाली म्हणाले, मी गेले ३५ वर्षापासून एसबीसी आंदोलन ही चळवळ उभी केली. मुंबई मंत्रालयासमोर अनेक वेळा आमरण उपोषण केले. अनेक केसेस हायकोर्टामध्ये दाखल केल्या परंतु अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एसबीसी प्रवर्गामध्ये ज्या ज्या जाती आहेत त्या त्या जातीचे प्रमुख वक्ते एकत्र येऊन मोठे आंदोलन करणे ही काळाची गरज आहे. यासाठी अहिल्यानगरमध्ये सुद्धा बेमुदत उपोषण करावे लागेल. यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.
यावेळी राज्य जनरल सेक्रेटरी जितेंद्र कांचानी यांनी एसबीसी आरक्षण स्वतंत्र का मिळावे याबाबत विस्तृतपणे माहिती दिली. या लढ्यासाठी सर्व जातीतील घटकांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.
(Reservation) यावेळी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे अशोक सब्बन म्हणाले, कोणतीही मागणी पूर्ण करायची असेल तर त्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. एसबीसी राखीव आरक्षण दिलेले असताना त्याची अंमलबजावणी प्रशासन का करत नाही? याचाच अर्थ एसबीसीधारक याकरिता आजपर्यंत जागृत नाहीत. यासाठी आपल्याला सर्व एसबीसीधारकांना जागृत करणे काळाची गरज असून यापुढे प्रशासनाला जाग आणायची असेल व आपल्या मागण्या पूर्ण करायचे असेल तर मोठे जनांदोलन राज्यात उभे करावे लागेल.