फातेमाबी उमरअली कादरी यांचे वृध्दापकाळाने निधन  - Rayat Samachar

फातेमाबी उमरअली कादरी यांचे वृध्दापकाळाने निधन 

rayatsamachar
1 Min Read

निधनवार्ता | श्रीरामपूर

येथील शाह खाकसार जमातीच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका हज्जन फातिमाबी उमरअली कादरी (वय ८५) यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या.       महाराष्ट्र शासन बंद संघर्ष समितीचे प्रदेश उपाध्यक्ष व शाह खाकसार जमातीचे प्रमुख मेहबूबअली शाह, बहुजन समाज पक्षाचे जाकीर शाह, अब्बासअली शाह तसेच या छप्परबंद शाळेचे साबीरअली शाह यांच्या त्या मातोश्री व नगरसेवक मुख्तार शाह यांच्या सासूबाई होत्या. येथील कब्रस्तानात मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत त्यांचा दफनविधी पार पडला.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading