Public issue | तेलीखुंट परिसरातील मैलमिश्रित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासक डांगेंकडून नेहमीप्रमाणे कारवाईचे आश्वासन

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

अहमदनगर | ११ जून | प्रतिनिधी

(Public issue) तेलीखुंट चौक रस्त्यावर वारंवार तुंबणाऱ्या ड्रेनेज लाईनमुळे चेंबरमधून मैलमिश्रित पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले. या परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून व्यापारीवर्ग त्रस्त झाला. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत भाजपाचे नेते संजय ढोणे यांनी प्रशासक यशवंत डांगे यांच्याकडे तातडीने कारवाईची मागणी केली.

(Public issue) या मागणीनंतर डांगे यांनी प्रत्यक्ष तेलीखुंट परिसरात पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत संजय ढोणे, अजय ढोणे, इंजि. सुरेश इथापे, ए.के. गुगळे, दिलीप दारुणकर, अनिल मोरे, मजहर शेख, निलेश दारुणकर, विकी आव्हाड, विनायक भागवत, अभिजीत ढोणे, भारत ढोणे, धीरज गोडळकर, बापू गीते, निलेश राठोड, शुभम राऊत आदी उपस्थित होते.

(Public issue) पाहणीदरम्यान डांगे यांनी नागरिकांना दिलासा देत हा प्रश्न तातडीने सोडवण्याचे नेहमीप्रमाणे आश्वासन दिले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेला हा प्रश्न आता मार्गी लागण्याची अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *