कोल्हापूर | ५.६ | रयत समाचार
(Public issue) शिवराज्याभिषेक दिन ६ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. मात्र, अलीकडच्या काळात तारखेनुसार साजरा होणारा हा उत्सव बंद करण्याची मागणी काही घटकांकडून होत असल्याने या विषयावर नवा वैचारिक संघर्ष उभा राहताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी शिवराज्याभिषेकाच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय पैलूंवर ‘महाराष्ट्र दिनमान‘मधे परखड भूमिका मांडली आहे. ही मुलाखत ज्येष्ठ संपादक विजय चोरमारे यांनी घेतली.
(Public issue) या विशेष मुलाखतीत सावंत यांनी शिवराज्याभिषेकाचे नेमके ऐतिहासिक महत्त्व काय होते, आजच्या काळात त्याची गरज का आहे, तसेच या सोहळ्यामागील मूळ प्रेरणा कोणाची होती, याचा सखोल वेध घेतला आहे. शिवराज्याभिषेकाशी संबंधित अनेक ऐतिहासिक संदर्भ आणि वादग्रस्त प्रश्नांवर त्यांनी भाष्य करताना इतिहासातील काही प्रवाहांवर थेट टीका केली आहे.
(Public issue) या चर्चेत त्यांनी काही इतिहासकार, सामाजिक राजकीय व्यक्ती, तसेच विविध विचारप्रवाहांवर भाष्य करताना शिवराज्याभिषेकाभोवती उभ्या राहिलेल्या वादांचा संदर्भ दिला. शिवराज्याभिषेकाला विरोध करणारे कोण होते, त्यामागील हेतू काय होते आणि इतिहासाचे वेगवेगळे अर्थ लावण्यामागील राजकीय समीकरणे कोणती आहेत, याचाही ऊहापोह करण्यात आला.
इतिहास, राजकारण आणि सामाजिक चळवळींच्या छेदनबिंदूवर उभी असलेली ही मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरत असून शिवराज्याभिषेकाबद्दल नव्याने विचार करण्यास भाग पाडणारी ठरत आहे.
मुलाखत पाहण्यासाठी :
https://youtu.be/DvmPIkHpGrM?si=QvhkWGBlkY3xonVt

Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
