अहमदनगर |२२.१ | रयत समाचार
(Public issue) अहिल्यानगर महानगरपालिकेच्या हद्दीत विकसित करण्यात आलेल्या रस्त्यांवरील खड्डे अथवा रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे अपघात होऊन नागरिक जखमी झाल्यास किंवा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास संबंधित नागरिकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.
(Public issue) मा. उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका क्रमांक ६१/२०१३ मध्ये दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, महापालिकेमार्फत विकसित रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातात जखमी किंवा मृत्यू झालेल्या प्रकरणांमध्ये योग्य चौकशी करून नुकसानभरपाईबाबत कार्यवाही केली जाणार आहे.
(Public issue) यासाठी संबंधितांनी अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत, नवीन प्रशासकीय इमारत, पावन गणपती मंदिर शेजारी, छत्रपती संभाजीनगर रोड, अहिल्यानगर येथे सर्व पुराव्यांसह अर्ज सादर करावा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत या अर्जांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
या महत्त्वपूर्ण सूचनेची सर्व अहिल्यानगरकर नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे, अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर नोटिशीद्वारे करण्यात आले आहे.
India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक