Public issue | अहिल्यानगर मनपा सोशल मिडीयाचा ‘गोंधळात गोंधळ’; बाहेरगावच्या ‘आडाणी’ एजन्सीकडून चौक-कॉलनींची चुकीची नावे प्रसिध्द

SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ९.२ | रयत समाचार

(Public issue) अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सोशल मिडीया प्रचारासाठी नियुक्त करण्यात आलेल्या बाहेरगावच्या एका खाजगी ‘आडाणी’ सोशल मिडीया एजन्सीकडून मनमानी व निष्काळजी कारभार सुरू असल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहेत. फेसबुक व इन्स्टाग्रामवर मनपाच्या अधिकृत जाहिरातींमध्ये शहरातील अनेक चौक, कॉलनी व परिसरांची नावे चुकीच्या पद्धतीने देण्यात येत असून त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व संताप निर्माण झाला आहे.

(Public issue) महानगरपालिकेच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या वतीने बाहेरगावच्या ‘लाडक्या’ एजन्सीला प्रचाराचे काम देण्यात आले असल्याची चर्चा असून, या एजन्सीकडून शहरातील स्थानिक माहितीचा अभाव वारंवार दिसून येतो.

(Public issue) चौकाला नावच नसताना ‘भपाऱ्या’ जाहिराती : सोमवारी ता. ९ फेब्रुवारी रोजी रात्री १०:०८ वाजता मनपाच्या AMC NAGAR या अधिकृत फेसबुक पेजवर स्वच्छता मोहिमेची जाहिरात पोस्ट करण्यात आली. मात्र या जाहिरातीत चक्क एका चौकाला अस्तित्वात नसलेल्या नावाने संबोधण्यात आले.

मनमाड रोड व अहिल्याबाई होळकर मार्ग जिथे एकत्र येतो, त्या चौकाचे अधिकृत नामकरण ‘कॉम्रेड गोविंद पानसरे चौक’ असे करण्यात आलेले आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे भैरवनाथ वाकळे व सहकाऱ्यांनी तत्कालीन महापौर अभिषेक कळमकर यांच्याकडे नामकरणाचा ठराव मंजूर करण्याची मागणी केली होती. नगरसेवक कुमार वाकळे व संपत बारस्कर यांच्या सहकार्याने हा ठराव मंजूर होऊन ‘कॉम्रेड गोविंद पानसरे चौक’ असे अधिकृत नाव देण्यात आले होते. असे असताना सोशल मिडीया एजन्सीकडून चुकीच्या नावाने प्रसिध्दी करून शहराच्या अधिकृत नोंदींचीही अवहेलना होत आहे. पाईपलाईन रोडला ‘अहिल्याबाई होळकर मार्ग’ असे नाव दिलेले असताना मनपाची ‘आडाणी’ एजन्सी हे नाव द्यायला सतत विसरत असल्याचे दिसून येते. हे दूर्लक्ष करण्यासारखे नाही.
स्थानिक एजन्सींना संधी द्यावी – रोजगारालाही चालना : शहरातील चौक, कॉलनी, मार्ग यांची अचूक माहिती स्थानिक तरुणांकडे आहे. त्यामुळे अशा चुका टाळण्यासाठी महानगरपालिकेने बाहेरगावच्या एजन्सीऐवजी अहिल्यानगरातील स्थानिक एजन्सींना संधी द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
यामुळे शहरातील तरुणाईला रोजगार मिळेल तसेच मनपाच्या प्रसिद्धी कामात गुणवत्ता व विश्वासार्हता वाढेल.
महापौर व आयुक्त आयुक्तांकडे तक्रार व मागणी : वारंवार अशा चुका करणाऱ्या एजन्सीचे काम तात्काळ काढून घेऊन स्थानिक माहिती असलेल्या तरुणांकडे जबाबदारी द्यावी, अशी मागणी रयत समाचारच्या वतीने नुतन महापौर ज्योती अमोल गाडे तसेच आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे करण्यात येत आहे.
चुकीची जाहिरात पाहण्यासाठी लिंक : https://www.facebook.com/share/p/1FUc6RParn/Public issue

हे ही वाचा : Public issue | महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; रस्त्यांवरील अपघातात जखमी वा मृत्यू झाल्यास मिळणार नुकसान भरपाई; प्रशासक यशवंत डांगे यांचे अर्ज करण्याचे आवाहन

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

Share This Article