श्रीगोंदा | गौरव लष्करे
सावतानगर येथील बाबुर्डी रोडवरील नगरपालिकेचे पथदिवे बंद आहेत. public issue याकडे नगरपालिका लक्ष देत नसल्याने परिसरातील नागरिक नाराज आहेत. येथाल रहिवाशांची अंधारामुळे मोठी गैरसोय होते. या भागातील पथदिवे तात्काळ सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या भागातील पथदिवे बंद असल्यामुळे अंधारामध्ये अनेकदा अपघात होण्याचाही धोका आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावर साप, विंचू यासारखे प्राणी वावरत असतात, त्यामुळे जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, तरी याबाबत गांभीर्यपूर्वक विचार करुन लवकरात लवकर पथदिवे सुरू करावेत अन्यथा नगरपालिकेच्या बेजबाबदार कारभाराविरूध्द आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सावतानगर परिसरातील नागरिकांकडून देण्यात आला.
यासंबंधीचे मागणीपत्र किरण बनसुडे, सागर खेतमाळीस, युवराज तांबे आदींनी परिसरातील नागरिकांच्यावतीने मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत यांना दिले. मुख्याधिकारी किती दिवसात सकारात्मक निर्णय घेतात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.