श्रीरामपूर | १६ जानेवारी | सलीमखान पठाण
(press) पत्रकारीता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकार हा आपल्या जीवाची पर्वा न करता सद्विवेकबुद्धीचा वापर करून जनकल्याणार्थ अहोरात्र झटत असतो. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्याचे निराकरण करण्यासाठी शासन-प्रशासनाला प्रवृत्त करतो. समाजाला जागृत करून जगण्याच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या पत्रकाराच्या त्याग व समर्पणाप्रती सन्मान करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
(press) लोकसेवा विकास आघाडी आणि अशोक उद्योग समूहाचे वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून पत्रकारदिन साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार रमण मुथ्था, रमेश कोठारी, बाळासाहेब आगे, मनोज आगे, करण नवले, सुनील कुलकर्णी, सलिमखान पठाण आदींनी आपले मनोगत व्यक्त करत आभार मानले.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील, बाळासाहेब आगे, विकास अंत्रे, राजेंद्र बोरसे, नवनाथ कुताळ, विवेक लोहकणे, सलीमखान पठाण, मनोज आगे, शिवाजी पवार, प्रकाश कुलथे, महेश माळवे, करण नवले, पद्माकर शिंपी, प्रदीप आहेर, ज्ञानेश्वर गव्हले, दिपक उंडे, सुनिल कुलकर्णी, अशोक पटारे, बद्रीनारायण वढणे, नितीन शेळके, गौरव साळुंके, सुनिल नवले, सचिन उघडे, संतोष बनकर, मयुर पांडे, सुनिल पांढरे, जगदीश भावसार, संजय पगारे, मधुकर माळवे, मनोज कदम, गणेश छल्लारे आदी उपस्थित होते. माजी आ. मुरकुटे यांनी कार्यक्रमाच्या उपस्थितीत सर्व पत्रकारांना नववर्षाच्या व पत्रकारदिनाच्या शुभेच्छा देत तळागाळातील माणसाच्या न्यायहक्कासाठी लढण्याचे व निर्भिड राहून संविधानाचे रक्षण करण्याचे आवाहन केले.
यावेळी पत्रकार संघाच्या वतीने अशोक कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक निरज मुरकुटे यांचा सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
बुढो पे जवानी है…
अशोक बँकेत झालेल्या पत्रकारदिनाच्या कार्यक्रमात पत्रकारांमध्ये दोन संघटनांच्या गटबाजीवर बाळासाहेब आगे यांनी प्रश्न उपस्थित केला तसेच ऊसाच्या प्रश्नावरून मनोज आगे यांनी मुरकुटे यांना चिमटा काढला. त्यामुळे वातावरण थोडे गंभीर झाले होते. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांनी घडलेल्या काही घटनांचा संदर्भ देत हा शेर सादर केला –
ये दौर ए तरक्की भी आफत की निशानी है, बच्चो के बुढापा हैं बुढो पे जवानी है.
शेर ऐकल्यानंतर एकच हंशा पिकला व वातावरण निवळले.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.