(Politics) विश्व हिंदू परिषद (विहिंप) महाराष्ट्र प्रांत समिती व जिल्हा संच बैठक ता.१३ एप्रिल रोजी पुणे येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी विहिंपचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष ॲड.आलोक कुमार यांनी भूषवले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग अण्णा राऊत, क्षेत्रमंत्री (मुंबई-गोवा प्रांत) गोविंद शेंडे, प्रांतमंत्री किशोर चव्हाण, सहमंत्री ॲड.सतीश गोरडे व सर्व जिल्हा, विभागीय पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. अशुतोष लांडगे यांची जिल्हाध्यक्ष तर वसंतसिंग यांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
(Politics) यावेळी लांडगे म्हणाले, अहिल्यनगरमध्ये विहिंपची ‘संस्कृतीनिष्ठ’ विचारधारा पोहोचवण्यासाठी आम्ही कार्यरत राहू. ही केवळ पदनियुक्ती नसून एक जबाबदारी आहे, जी आम्ही पूर्ण निष्ठेने पार पाडू. वसंतसिंग यांनीही भावना व्यक्त करत सांगितले, विहिंपच्या मार्गदर्शनात समाजप्रबोधन व सेवा कार्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.
(Politics) नविन नियुक्त पदाधिकाऱ्यांचा जिल्हा मंत्री अनिल जोशी यांनी सत्कार केला. त्यांनी आपल्या भाषणात म्हणाले, नवीन नेतृत्वामुळे अहिल्यानगरमध्ये विहिंपचे कार्य अधिक जोमात सुरू होईल. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आपले कार्य पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. यावेळी विभागमंत्री सुनील खिस्ती आणि सहमंत्री शरद नगरकर यांचीही उपस्थिती होती. त्यांनी देखील नविन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत त्यांना संघटनात्मक बळकटीसाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले. इतर पदाधिकाऱ्यांनीही विश्वास व सहकार्याची ग्वाही दिली.
बैठकीपूर्वी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष ॲड.आलोक कुमार यांनी अहिल्यनगर येथे संत संवादासाठी भेट दिली होती. त्यांनी लांडगे व वसंतसिंह यांना विहिंपच्या कार्याची दिशा व कार्यपद्धती विषद केली. ही बैठक विहिंपच्या राष्ट्र व धर्मकार्याच्या दृढ संकल्पाचे प्रतीक ठरली.
अधिक माहिती देताना अर्बन बँक माजी संचालक तथा बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांनी सांगितले, ११४ वर्षाची वैभवशाली नगर अर्बन बँक बंद पाडण्याच्या कट कारस्थानातील सूत्रधार बँकेचे कोट्यावधी रूपये आशुतोष लांडगेच्या नगर मर्चटस बँकेतील खात्यात पाठविण्यात येत होते. नंतर सर्वजण मिळून वाटप करून घ्यायचे. उदा.चिंचवड शाखेत २२ कोटींचे बोगस कर्ज केल्याचे दाखवून त्यातील ११ कोटी लांडगेच्या खात्यात पाठवून नंतर सर्वांनी आपापसात वाटप करून घेतले. १-१ रूपयांची २.५० कोटींच्या नाण्यांचा भरणा केल्याचे खोटे रेकॉर्ड तयार करून या पैशाची लूट करण्यात आली. आशुतोष लांडगे व कै.दिलीप गांधी हे संगनमताने गोरगरिबांच्या पैशाची लूट करत असल्याबाबत आवाज उठविणारे राजेंद्र गांधींसारखे वडीलांच्या वयाच्या व्यक्तीवर आशुतोष लांडगेने बँकेच्या अधिकारी यांच्यासमोर जीवघेणा हल्ला केला होता. लांडगेवर चिंचवड पोलीस स्टेशन गु.र.नं. १८/२०२१ दाखल असून यात लांडगे यास अटक झाली होती. कोतवाली पोलीस स्टेशन गु.र.नं.६२६०/२०२० यात देखील अटक झाली होती. गु.र.नं.१२१/२०२२ अंतर्गत एकूण २९१ कोटींच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी असून अटकपुर्व जामीनावर आहे. याशिवाय माझ्यावर हल्ला केल्याबद्दल केस सुरू आहे, अशी माहिती अर्बन बँक माजी संचालक तथा बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांनी दिली.