अहमदनगर | ६ एप्रिल | प्रतिनिधी
(Politics) भारतीय जनता पार्टीच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त अहमदनगर येथील पक्ष कार्यालयात झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सभापती राम शिंदे, शहराध्यक्ष ॲड. अभय आगरकर, प्रविण ढोणे, भानुदास बेरड, सदा देवगांवकर, प्रशांत मुथा, मिलींद गंधे, सचिन पारखी, बाबासाहेब सानप आदी उपस्थित होते.
(Politics) यावेळी राम शिंदे म्हणाले, या दिवशी संघटन, सेवा, संघर्ष आणि सुशासनाच्या मूल्यांचा पुन्हा एकदा पुनर्प्रत्यय आला. हे केवळ झेंडावंदन नव्हते, तर आपल्या विचारधारेप्रती आणि राष्ट्रसेवेप्रती असलेली निष्ठा पुन्हा दृढ करण्याचा एक पवित्र क्षण होता. पक्षाच्या कार्यपद्धतीला आणि जनतेसाठी चाललेल्या प्रामाणिक प्रयत्नांना सलाम करत ‘सेवा, संघटन आणि समर्पण’ या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
(Politics) यावेळी मधुसूदन मुळे, सुनिल रामदासी, अनिल गट्टाणी, भैया गंधे, वसंत लोढा, साहेबराव विधाते, गिता गिल्डा, विवेकानंद इंग्लिश स्कूलचे दामोदर बठेजा, विवेक नाईक, बाबासाहेब वाकळे, बाळासाहेब महाडीक, अर्बन बँकेचे सुवेंद्र गांधी, निशांत दातीर, महेश नामदे, छाया रजपूत, सुरेखा खरमाळे, संध्या पावसे, सविताताई कोटा, ज्योती दांडगे, पल्लवी जाधव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा : Social | नैतिकता : समाजांतर्गत सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक – संजय सोनवणी
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.