मुंबई | १७ जून | गुरुदत्त वाकदेकर
(Politics) महाराष्ट्र सरकारच्या २०२४–२५ च्या अर्थसंकल्पात आदिवासी घटकासाठी करण्यात आलेल्या तरतुदी आणि प्रत्यक्ष खर्च यामध्ये मोठी तफावत असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासपूर्ण अहवालातून समोर आला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या आदिवासी विकास केंद्रातर्फे हा अभ्यास अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून, त्याचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले.
(Politics) महत्त्वाच्या निरीक्षणांनुसार : आरोग्य विभागासाठी ₹२५,०१५ कोटींची तरतूद असूनही प्रत्यक्ष खर्च ₹२०,०५० कोटीच झाला आहे. शिक्षण विभागासाठी ₹८९,७०५ कोटी मंजूर असून त्यापैकी सुमारे ₹८३,३०० कोटी खर्च झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र, पोषण आहार योजना, मातामृत्यू प्रतिबंध, तसेच आश्रमशाळा आणि छात्रावास योजनांसाठीचा निधी रखडलेला असल्याचे नमूद करण्यात आले.
