Politics | पर्यावरण संवर्धनासाठी समाजाने पुढाकार घ्यावा- भुजबळ; ‘ग्रीन सिटी’ उपक्रमाबद्दल उपमहापौर जाधव यांचा सन्मान

सकल माळी समाजाचा पुढाकार

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ३.५ | रयत समाचार

(Politics) शहरात राबविण्यात येत असलेल्या ‘अहिल्यानगर ग्रीन सिटी’ या उपक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल उपमहापौर धनंजय जाधव यांचा सकल माळी समाजाच्या वतीने उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या उपक्रमाबद्दल जाधव यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

(Politics) कार्यक्रमास ओबीसी नेते रामदास फुले, विश्वस्त विनोद पुंड, कोअर कमिटी सदस्य अमोल भांबरकर, अनिल इवळे, संताजी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन हरिभाऊ डोळसे, गायत्री परिवाराचे प्रमुख काशिनाथ मोडे, रोहित पठारे, चंद्रकांत पुंड, कॅप्टन सुधीर पुंड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Politics) ग्रीन सिटी उपक्रमांतर्गत वृक्षारोपण, स्वच्छता अभियान आणि पर्यावरण जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले, ज्यामुळे शहरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी भुजबळ म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन राखणे ही आजची अत्यंत गरज बनली आहे. वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे प्रदूषणाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हरितक्षेत्रे कमी होत असल्याने वातावरणातील समतोल ढासळत चालला आहे. अशा परिस्थितीत ‘ग्रीन सिटी’ सारखे उपक्रम केवळ आवश्यकच नाहीत, तर ते भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात. प्रत्येक नागरिकाने आपल्या स्तरावर पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. पर्यावरण संवर्धनासाठी समाजाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन सकल माळी समाज ट्रस्टचे उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले.
ते पुढे म्हणाले, पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर ती समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. आपण प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संगोपन केले, तर शहराचे रूप पालटू शकते. युवकांनी विशेषतः पुढे येऊन या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केल्यास आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वच्छ, सुंदर आणि निरोगी वातावरण निर्माण करू शकतो, असा विश्वास मला वाटतो.
ओबीसी नेते रामदास फुले यांनी आपल्या भाषणात सांगितले, अहिल्यानगर ग्रीन सिटी हा केवळ एक उपक्रम नसून तो सामाजिक परिवर्तनाची सुरुवात आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होत आहे आणि सकारात्मक बदल दिसून येत आहेत. शहराच्या विकासासोबत पर्यावरणाचे रक्षण करणे ही मोठी जबाबदारी आहे. अशा उपक्रमांना सर्व समाजघटकांनी पाठबळ देऊन त्यात सक्रिय सहभाग नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे.
सत्काराला उत्तर देताना उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले, माळी समाजाच्या वतीने झालेला हा सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आणि जबाबदारी वाढवणारा आहे. ‘ग्रीन सिटी’ उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही शहर अधिक हरित आणि स्वच्छ करण्यासाठी विविध योजना राबवत आहोत. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि सहकार्य मिळाल्यास हे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होईल. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने पुढे येऊन योगदान देणे हीच खरी गरज आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांचा गौरव करण्यात आला तसेच पर्यावरण संवर्धनासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ‘ग्रीन सिटी’ उपक्रमामुळे अहिल्यानगर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

Public issue | महापालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; रस्त्यांवरील अपघातात जखमी वा मृत्यू झाल्यास मिळणार नुकसान भरपाई


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading