Politics | अहिल्यानगर होणार हिरवेगार; 'ग्रीन सिटी' मोहिम चालू; 1 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट - Rayat Samachar

Politics | अहिल्यानगर होणार हिरवेगार; ‘ग्रीन सिटी’ मोहिम चालू; 1 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

rayatsamachar
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ५.६ | रयत समाचार

(Politics) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगर शहरात आज ‘ग्रीन सिटी’ मोहिम अत्यंत उत्साहात चालू करण्यात आली. न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महानगरपालिकेचे उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांच्या उपस्थितीत रामचंद्र दरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून ही मोहिम चालू करण्यात आली.
(Politics) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात आली असून, साई द्वारका ट्रस्ट आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ती राबवली जात आहे. या अंतर्गत येत्या एका वर्षात शहरात तब्बल १ लाख वृक्षांची लागवड आणि संवर्धन करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती उपमहापौर जाधव यांनी दिली.
(Politics) यावेळी मनपा उपायुक्त नागेंद्र मुतकेकर, दिपलक्ष्मी म्हसे, मेहेर लहारे, शशिकांत नजन, इंजि. कैलास दिघे, हर्षल आगळे, आठरे सर, सुरेश खामकर, अमित खामकर आणि राजेंद्र पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शहर हिरवेगार आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी ही मोहीम केवळ प्रशासनाची न राहता एक ‘लोकचळवळ’ व्हावी, म्हणून नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading