Ipl

Politics | मुंबई, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्वायत्ततेचा सरकारी विचार; अभ्यासासाठी उच्चस्तरीय समिती

SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | १३.३ | रयत समाचार

(Politics) मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जे. समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थांना स्वायत्तता देण्याच्या प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही समिती गठित करण्यात आली असून राज्याचे माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

(Politics) यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने ता.१३ मार्च २०२६ रोजी शासन निर्णय (जीआर) प्रसिद्ध केला आहे. समितीने संबंधित संस्थांना स्वायत्त दर्जा देण्याची आवश्यकता, त्याची अंमलबजावणीची प्रक्रिया आणि प्रशासकीय- आर्थिक रचना याबाबत सविस्तर आराखडा तयार करायचा आहे.

(Politics) या समितीत आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये डॉ. राजेंद्र बडवे (माजी संचालक, टाटा मेमोरियल रुग्णालय), डॉ. संजय ओक (माजी संचालक, के.ई.एम. रुग्णालय), डॉ. रणजीत माणकधर (ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज), डॉ. राजेश कार्यकते (बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे) यांच्यासह महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे कुलसचिव आणि महाराष्ट्र वैद्यक परिषदेचे प्रबंधक यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.

- Advertisement -
Ad image

समिती राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची प्रशासकीय व शैक्षणिक रचना, स्वायत्त संस्थांचे देशविदेशातील मॉडेल, आर्थिक व प्रशासकीय स्वायत्ततेची व्यवस्था तसेच शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या सेवा अटी यांचा अभ्यास करणार आहे.

समितीने तीन महिन्यांच्या आत शासनाकडे अहवाल सादर करायचा असून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

https://esamaadprakashan.com/books/mithila-va-maithila-rajavamshacha-itihasa-by-gangabai/

Share This Article