Politics | गांधीजींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; हर्षु ठाकूरसह आयोजकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

शेवगावात सर्वपक्षीय मागणी

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

शेवगाव | ३०.३ | रयत समाचार

(Politics) येथे रामनवमी निमित्ताने झालेल्या सभेत हर्षु ठाकूर या महिलेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह व निंदाजनक वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी संबंधित महिला व कार्यक्रम आयोजकांविरोधात राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची सर्वपक्षीय मागणी करण्यात आली आहे.

(Politics) हर्षु ठाकूर यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत “हरामखोर गांधी” असे शब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मुस्लिम व ख्रिश्चन समाजाबद्दलही अत्यंत द्वेषपूर्ण व शिवराळ भाषेत वक्तव्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे समाजात तेढ, वाद व अशांतता निर्माण होईल असे जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला.

(Politics) या पार्श्वभूमीवर शेवगाव येथील सर्व संविधानप्रेमी, शांतताप्रेमी नागरिक, विविध पक्ष व संघटनांच्या वतीने संबंधित महिला तसेच तिचा सत्कार करणाऱ्या आमदारांविरोधात तात्काळ दखलपात्र गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
या घटनेच्या निषेधार्थ ता.३० रोजी शेवगाव येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर सर्वपक्षीय उपोषण व आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी यांच्या योगदानाचा उल्लेख करण्यात आला तसेच शेवगाव शहरात धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.Politics
यावेळी पोलिस व प्रशासन यांच्या संमतीने दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोप करत संताप व्यक्त करण्यात आला. तसेच असे वक्तव्य करणारे व कार्यक्रम आयोजक यांच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. शेवगावचे संतोष मुटकुळे यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले.
या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुका प्रमुख ॲड. अविनाश मगरे, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष समीर काझी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी कॉ. संदीप इथापे, शेतकरी संघटनेचे दत्ता फुंदे, माजी सरपंच एजाज काझी, धनंजय डहाळे, कॉ. बापूराव राशिनकर, दत्तात्रय आरे, दिनेश लव्हाट, समद काझी, शेख इलाही, सुरेश मगर आदी उपस्थित होते.

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading