Politics | धर्मरक्षणासाठी आर्थिक सक्षमता गरजेची; हिंदू समाजाने स्वाभिमान जागृत ठेवावा- मिलिंद परांडे

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पिंपरी | प्रदीप गांधलीकर

(Politics) धर्म आणि संस्कृतीशिवाय समाज एकसंध राहू शकत नाही. हिंदू धर्म टिकून राहण्यासाठी आर्थिक सक्षमता अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले. कामशेत येथे अशोक सिंघल मेमोरियल ट्रस्ट, मुंबई संचालित ग्रामदूत प्रकल्पांतर्गत आयोजित आर्थिक साक्षरता व महिलांच्या आर्थिक सबलीकरण कार्यक्रमात ते बोलत होते.

Politics

(Politics) यावेळी विश्व हिंदू परिषद अध्यक्ष प्रा. गजानन धारणे, अनिरुद्ध पंडित, प्रांतमंत्री किशोर चव्हाण, सहमंत्री ॲड.सतिश गोरडे, संस्थेचे विश्वस्त सुरेश पंसारी, मनमोहन गोयंका, पवन पोदार, बालकिशन अगरवाल, श्याम गुजरपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
परांडे म्हणाले, आदरणीय अशोकजी सिंघल यांनी रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून हिंदू समाजात स्वाभिमान आणि चैतन्य निर्माण केले. आजही अनेक भारतीय ब्रिटिश गुलामगिरीच्या मानसिकतेतून पूर्णपणे बाहेर आलेले दिसत नाहीत. साधूसंत आणि देशभक्तांनी समाजजागृतीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

(Politics) ते पुढे म्हणाले, अशोकजींच्या नावाने कार्यरत असलेली संस्था आर्थिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, आरोग्य आणि पाणी यांसारख्या मूलभूत क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहे. अंदर मावळ परिसरातील सुमारे ५६ गावे आणि तीन वस्त्यांमध्ये गेली तीन वर्षे ही संस्था सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. या कामाची व्याप्ती अधिक व्यापक झाली पाहिजे.
हिंदू समाजाचा जन्मदर कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी जनगणनेत धर्माचा उल्लेख ‘हिंदू’ असा करण्याचे आवाहनही केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गवळी यांनी केले, तर सुरेश पंसारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कांचन राळे (संगणक), पूजा जाधव (शिवणकाम), वर्षा चव्हाण, अश्विनी केंगले, अर्चना इंगळे, सायली शिंदे (गृह उद्योजिका), संध्या शिंदे (स्वविकास केंद्र) आणि स्तनदा माता श्रद्धा जाधव यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनम राणे यांनी केले.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

TAGGED:
Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading