ढाका | रयत समाचार
(India news)बांगलादेशमध्ये ईद-उल-अजहा पूर्वी एका दुर्मिळ अल्बिनो म्हशीने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला. ‘डोनाल्ड ट्रम्प’ या टोपणनावाने ओळखली जाणारी ही ७०० किलो वजनाची म्हैस तिच्या अनोख्या रूपामुळे देशभर चर्चेचा विषय ठरली.
ढाक्याजवळील शेतकरी झियाउद्दीन मृधा यांनी वाढवलेल्या या म्हशीची गुलाबी छटेची त्वचा आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड टर्म्प यांच्या प्रसिद्ध हेअरस्टाइलसारखा दिसणारा सोनेरी केसांचा तुरा यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली.
(India news) ही म्हैस पाहण्यासाठी आणि तिच्यासोबत छायाचित्रे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांनी शेतावर गर्दी केली. तिचा शांत स्वभाव आणि वेगळे रूप यामुळे सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.
(India news) ईद-उल-अजहा निमित्त पारंपरिक कुर्बानीसाठी अखेर या म्हशीची विक्री करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या ‘व्हायरल म्हशी’ची अखेरची झलक पाहण्यासाठी नागरिकांची अजूनही मोठी गर्दी होत आहे.
या अनोख्या म्हशीमुळे बांगलादेशात ईदपूर्वी वेगळ्याच चर्चांना उधाण आले असून, इंटरनेटवरही ‘डोनाल्ड ट्रम्प म्हैस’ हा विषय ट्रेंड होत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
