Politics | राज्यातील कंपनी आणि महाराष्ट्र सरकारचा थेट स्वित्झर्लंडमधे करार; ठरतोय चर्चेचा विषय

१ लाख कोटींची आयटी डेटा सेंटर्स गुंतवणूक

SubEditor | Dipak Shirasath

दावोस |२०.११ | रयत समाचार

(Politics) जागतिक आर्थिक मंचाच्या पार्श्वभूमीवर स्वित्झर्लंडमधील दावोस येथे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक गुंतवणूक करार झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि Lodha Developers Limited यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

(Politics) या कराराअंतर्गत IT / ITes व डेटा सेंटर्स क्षेत्रात तब्बल १,००,००० कोटींची गुंतवणूक होणार असून, त्यातून १.५० लाख थेट व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील. भारतातील असलेल्या कंपनीचा करार महाराष्ट्रात न होता थेट स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झाल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.

हा प्रकल्प महाराष्ट्राला देशातील प्रमुख डिजिटल व डेटा इन्फ्रास्ट्रक्चर हब म्हणून अधिक बळकटी देणारा ठरणार आहे.

(Politics) लोढा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक लोढा यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, उच्च तंत्रज्ञान, रोजगारनिर्मिती आणि गुंतवणूक- अनुकूल धोरणांमुळे महाराष्ट्र जागतिक गुंतवणूकदारांचे पसंतीचे राज्य बनत आहे.
राज्यातील कंपनीचा थेट दावोस येथे झालेला हा करार ‘डिजिटल महाराष्ट्र’च्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे.

हे ही वाचा : प्रेस इन्फर्मेशन ब्युरो

मुख्य पृष्ठ

Share This Article