Politics | कापड व्यापारी संघाचा अमृत महोत्सवी सोहळा साजरा; मुख्य बाजारपेठेतील प्रश्नाबद्दल आ. जगताप यांचा सत्कार

Politics | कापड व्यापारी संघाचा अमृत महोत्सवी सोहळा साजरा; मुख्य बाजारपेठेतील प्रश्नाबद्दल आ. जगताप यांचा सत्कार

अहमदनगर |०९.१० |रयत समाचार

(Politics) शहरातील कापड व्यापारी संघाचा ७५ वा अमृत महोत्सवी स्थापना दिवस कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास आ. संग्राम जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आमदार जगताप यांनी शहराच्या बाजारपेठेच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची ‘आठवण’ करून दिली. त्यांनी आनंदधाम चौपाटीचे स्थलांतर करून परिसराचे पावित्र्य राखले तसेच लहान व्यापाऱ्यांच्या रोजंदारीचा प्रश्न समन्वयाने सोडविला.

 

(Politics) तसेच मुख्य बाजारपेठेतील स्वच्छतागृहाची गरज आणि पार्किंग समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यासाठी अत्याधुनिक प्रकल्पाला मंजुरी मिळवून देत, व्यापारीवर्गाची अनेक दशकांची मागणी पूर्ण केली. या उल्लेखनीय योगदानाबद्दल कापड व्यापारी संघाच्या वतीने विठ्ठल-रुक्मिणी प्रतिमा आणि गोमातेची मूर्ती, शाल व पगडी देऊन जगतापांचा सत्कार केला.

(Politics) आमदार जगताप यांनी यावेळी भविष्यातील विकास प्रकल्पांविषयी माहिती देत नगरची बाजारपेठ अधिक सुसज्ज, सुदृढ व व्यापारासाठी अनुकूल बनेल, असा विश्वास व्यक्त केला.
सोहळ्यात संघाचे उपाध्यक्ष सचिन चोपडा, राजेंद्र गांधी, सेक्रेटरी मुकेश अरोरा, रजनीकांत गांधी, संजय चोपडा तसेच अन्य पदाधिकारी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी भाग्यवान विजेत्यांसाठी सोडत काढण्यात आली, आणि विजेत्यांना आ. जगताप यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
अहमदनगर आर्थिक राजकारण व्यापार