Politics | लोकशाही टिकवण्यासाठी वाचणे, लिहिणे आणि विचार मांडणे हीच खरी लढाई- अनिल देशमुख; ‘फ्रेंड्स ऑफ डेमोक्रसी’च्या सभेतील स्पष्ट मत

हुकूमशाहीविरोधात आवाज बुलंद

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

 मुंबई | २७ जून | प्रतिनिधी

(Politics) मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात ‘फ्रेंड्स ऑफ डेमोक्रसी’ या संस्थेच्यावतीने आयोजित ‘फॅसिस्ट हुकूमशाहीविरोधी सभा’ नुकतीच संपन्न झाली. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थितांना उद्देशून भाषण करताना केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

Politics

(Politics) यावेळी देशमुख म्हणाले, देशात सध्या संविधानिक संस्थांची गळचेपी सुरू असून, देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात आले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांना खोट्या आरोपांमध्ये अडकवून हिटलरशाही पद्धतीने राजवट चालवली जात आहे. ही बाब गंभीर असून जनतेने याविरोधात जागरूक होणे गरजेचे आहे.

Politics

(Politics) या कार्यक्रमाला खासदार संजय राऊत, माजी आमदार कुमार सप्तर्षी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, गुजरातमधील कार्यकर्त्या श्वेता संजीव भट यांच्यासह अनेक नामवंत वक्ते आणि विचारवंत उपस्थित होते.

 

कार्यक्रमात हुकूमशाहीविरोधी विचारांचे पुस्तके देखील प्रकाशित करण्यात आली. या प्रसंगी बोलताना वक्त्यांनी सत्तेच्या दडपशाहीविरुद्ध लोकशाहीच्या बाजूने आवाज उठवण्याचे आवाहन केले. “लोकशाही टिकवण्यासाठी वाचणं, लिहिणं आणि विचार मांडणं हीच खरी लढाई आहे,” असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन अत्यंत सुयोजित असून, लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत सहभागी वक्त्यांनी व्यक्त केले.

हे ही वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *