Education | ITI विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवणारा ‘C2IC’ प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण

TNS इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने डॉ. विखे पाटील आयटीआयमध्ये प्रशिक्षण व कॅम्पस मुलाखती संपन्न

अहमदनगर | २७ जून | प्रतिनिधी

(Education) डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एमआयडीसी, अहमदनगर आणि मुंबईस्थित TNS इंडिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेला “Campus to Industrial Careers (C2IC)” प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकास, उद्योगसज्जता व रोजगारसंधी वाढवण्याच्या हेतूने ३ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या सामंजस्य करारानंतर हा उपक्रम सुरू करण्यात आला होता.

(Education) या उपक्रमाअंतर्गत १०३ विद्यार्थ्यांना एकूण २०० तासांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. वैयक्तिक, व्यावसायिक आणि ग्रीन स्किल्स यांचा समावेश असलेल्या या प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानपुरवठा न करता उद्योगाभिमुख सर्जनशीलता आणि आत्मविश्वास निर्माण करणे हाच होता. सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

(Education) प्रशिक्षणातील प्रमुख बाबी : योग्य करिअर निवडीसाठी मार्गदर्शन व आत्ममूल्यांकन. सीव्ही व अर्ज प्रक्रिया, मुलाखतीसाठी तयारी. संवाद कौशल्ये, ईमेल शिष्टाचार, कार्यस्थळी वर्तन व नैतिकता.

ग्रीन स्किल्स : इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, EV बॅटरी व मोटर्स, सौर पीव्ही मॉड्यूल्स, नूतनीकरणीय ऊर्जा व पर्यावरण संरक्षण
प्रशिक्षणानंतर २० जून रोजी संस्थेमध्ये UKB Electronics Pvt. Ltd. (रांजणगाव MIDC) व Bajaj Electricals Ltd. (महाळुंगे इंगळे, तळेगाव-चाकण रोड) या नामवंत कंपन्यांच्या कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. या माध्यमातून ३९ विद्यार्थ्यांची थेट निवड झाली.
विद्यार्थ्यांमध्ये दिसून आलेले बदल : आत्मविश्वासात लक्षणीय वाढ. प्रभावी संवाद व व्यक्तिमत्त्व विकास. उद्योग क्षेत्रातील व्यवहारिक समज. पर्यावरणपूरक व तंत्रज्ञानस्नेही विचारसरणी
या यशस्वी उपक्रमाबद्दल डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, डॉ. पी.एम. गायकवाड, सुनील कोल्हापुरे, डॉ. अभिजीत दिवटे, प्राचार्य ए.व्ही. सूर्यवंशी, उपप्राचार्य काकडे, गटनिदेशक पठारे व भुसे, प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी अरुण म्हस्के, TNSIF प्रतिनिधी प्रणव गोडले तसेच संपूर्ण ITI टीमचे अभिनंदन करण्यात आले आहे.
C2IC उपक्रम हा केवळ प्रशिक्षण नसून, तो शिक्षण व उद्योग यामधील दुवा बळकट करणारा Industry-Academia Interface चा आदर्श नमुना ठरला आहे. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या दृष्टीने मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला आहे.

हे हि वाचा : Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’; ‘खोपडे पॅटर्न’ : एक भारतीय प्रयोग, जागतिक मान्यता

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *