नगर तालुका | १६ फेब्रुवारी | प्रतिनिधी
(Politics) शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यास जीवनात निश्चित यश मिळते, असे प्रतिपादन जिल्हा कौशल्य विकास समितीचे सदस्य आणि रा.स्व.संघ भाजपाचे विनायक देशमुख यांनी केले. वाळुंज पारगाव येथील ज्ञानदीप विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात देशमुख बोलत होते.

(Politics) यावेळी वसंत लोढा, ॲड. राजेंद्र बलदोटा, अरुण दुगड, अभिजीत साळुंखे, ॲड. रोहित बलदोटा, इंजि. हर्षवर्धन देशमुख, मुख्याध्यापक भाऊसाहेब रोहकले, डॉ. बबनराव जाधव, सुखदेव दरेकर, मेजर रावसाहेब शिंदे, मच्छिंद्र पा. हिंगे, मेजर बाजीराव दरेकर, विठ्ठलराव बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
(Politics) प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, शालेय जीवनात तुम्ही जे ठरवाल ते आयुष्यात घडू शकते. आपल्या सभोवताली अनेक प्रेरणादायी घटना घडत असतात मात्र जाणीवपूर्वक ती उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर आणण्याची गरज आहे. नगर तालुक्यातील राळेगणच्या विजय कुलांगे या तरुणाने आपल्या अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करून २०१२ मध्ये यू.पी.एस.सी. परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले. आज कुलांगे हे ओरिसा राज्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जीवनात अशक्य काहीच नाही मात्र त्यासाठी जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.
केंद्र शासनाच्य मदतीने ज्ञानदीप विद्यालयात ‘अटल टिंकरिंग लॅब’ सुरू करण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन देशमुख यांनी यावेळी सांगितले. देशमुख, ॲड. बलदोटा यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
हे ही वाचा : History | बळीराजा : भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप – संजय सोनवणी