नेवासा | २ ऑक्टोबर | शफीक बागवान
Politics ऊसाला जास्तीत जास्त भाव देता यावा यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने पुढाकार घेऊन साखरेची एमएसपी ३१ रुपये वरून ४२ रुपये प्रति किलो तसेच इथेनॉलला प्रति लिटर १० रुपये किंमत वाढवून द्यावी, अशी मागणी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी केली आहे.
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. जिल्हा बँक व कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, जेष्ठ संचालक अड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, डॉ. क्षितिज घुले पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, दिलीपराव लांडे, काशीनाथ नवले आदीसह सर्व संचालक मंडळ मंचावर उपस्थित होते.
प्रारंभी अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव जनार्दन पटारे यांनी मांडला, त्यास डॉ. शिवाजी शिंदे यांनी अनुमोदन दिले.
नरेंद्र घुले पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल उद्योगाला चालना देण्याचा निर्णय घेतला, त्यानुसार आपण इथेनॉलचा प्रकल्प उभा केला असून पूर्वीची प्रतिदिन ५० हजार लिटर क्षमता असलेल्या प्रकल्पाचे विस्तारीकरण केल्यामुळे आता प्रतिदिन १ लाख ४२ हजार लिटर इथेनॉल निर्मिती होईल.
प्रत्येक गळीत हंगामामध्ये किमान १३ लाख ५० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ३ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती आणि साडेपाच कोटी युनिट विजेची निर्यात होणे गरजेचे आहे.
माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले की, कोण कोणाचा हे न बघता सर्वांना बरोबर घेऊन निर्भेळ संस्था चालविणे हे बाळकडू लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिलेले आहे. सर्वांचा सूचनांचा विचार करून चांगले निर्णय संचालक मंडळ घेते. सरकारचे साखर उद्योगा बाबतचे धोरण अडचणीचे आहेत.
संचालक काकासाहेब नरवडे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, अंकुश काळे, अशोकराव मिसाळ, रामदास कोरडे, कॉ.अप्पासाहेब वाबळे, अशोकराव उगले, रामनाथ राजपुरे यांनी मनोगत व्यक्त केले.
सभेस तुकाराम मिसाळ, भय्यासाहेब देशमुख, प्रभाकर कोलते, दत्तात्रय काळे, डॉ.शिवाजी शिंदे, संचालक काकासाहेब शिंदे, प्रा.नारायण म्हस्के, पंडितराव भोसले, अशोकराव मिसाळ, बबनराव भुसारी, भाऊसाहेब कांगुणे, जनार्धन कदम, शिवाजी कोलते, मच्छिद्र म्हस्के, सखाराम लव्हाळे, दीपक नन्नवरे, शंकरराव पावसे, विष्णू जगदाळे, कामगार संचालक सुखदेव फुलारी, संभाजीराव माळवदे, ज्ञानदेव दहातोंडे, गणेश गव्हाणे, सोपान महापुर, राम पाअुलबुधे, विश्वास काळे, जनार्धन पटारे, मोहनराव देशमुख, शिवाजीराव भुसारी, शिवाजीराव गवळी, शरद आरगडे, एकनाथ कावरे, डॉ.सुधाकर लांडे, मधुकर वावरे, अड.सतीश पाटील, बबनराव धस, अनिलराव मडके, दिलीप मोटे, काकासाहेब काळे, बाळासाहेब साळुंखे, अरुण देशमुख, देविदास पाटेकर, कैलास नेमाने, भारत साबळे, महेश मोटे, राहुल मोटे, एड. हिम्मत देशमुख, भारत गुंजाळ, भाऊराव आगळे, काकासाहेब काळे, मंगेश थोरात, साहेबराव आंधळे, दत्तात्रय खाटीक, अंबादास कळमकर, बाळासाहेब मरकड, भास्कर खेडकर, आबासाहेब ताकटे, जनार्दन हारदे, भरत वांढेकर, बबन भानगुडे, एकनाथ भुजबळ, रामदास कदम आदी यावेळी उपस्थित होते.
कारखान्याचे जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी सभा नोटीसीचे वाचन केले.
सचिव रवींद्र मोटे यांनी अहवाल सालातील दिवंगतांना श्रध्दांजली अर्पण करणारा ठराव मांडला व मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन केले. मुख्य लेखपाल रामनाथ गरड यांनी नफा-तोटा पत्रके, ताळेबंदाचे वाचन केले. दादासाहेब गंडाळ यांनी आभार मानले.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.