नेवासा | २५ सप्टेंबर | प्रतिनिधी
Politics मध्यमेश्वर बंधारा पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी बंधाऱ्यावरील फळ्या आत्ताच टाका, अशी मागणी नेवासा नगरपंचायत नगरसेवक व इंजि. सुनील वाघ यांनी पाटबंधारे विभागाचे वडाळा महादेव येथील उपविभागीय अभियंता यांच्याकडे केली. मागणीची दखल न घेतल्यास नेवासकर नागरिक व लाभधारक शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तिव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.
इंजि. सुनील वाघ यांनी म्हटले की, नेवासा शहरालगत प्रवरा नदीवर असलेल्या मध्यमेश्वर कोल्हापूर बंधारा हा नेवासा शहर व परिसरातील शेतीसाठी वरदान ठरलेला आहे. त्यासाठी हा पूर्ण क्षमतेने भरणे गरजेचे आहे, परंतु आज पावेतो बंधाऱ्यावर एकही फळी टाकली गेलेली नाही. त्यामुळे प्रवरा नदी पात्रातील पावसाचे सर्व पाणी खाली वाहून गेले. पावसाळा संपत आलेला आहे, अजूनपर्यंत आपल्या खात्याकडून फळ्या टाकण्याची कुठलीही हालचाल दिसत नाही. यामुळे बंधारा कोरडा होऊन मोठ्या प्रमाणात पुढील समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
बंधाऱ्यावरील वस्तुस्थिती लक्षात घेता बंधाऱ्याच्या सर्व फळ्या लवकरात लवकर टाकण्यात याव्यात, जेणेकरून बंधारा पूर्ण क्षमतेने भरु शकेल. आपणाकडून याबाबत कुचराई झाली, बंधारा पूर्ण क्षमतेने भरला नाही तर लाभधारक, नागरिक शेतकऱ्यांसह नेवासकरांच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.