अहमदनगर | १४.४ | रयत समाचार
(Politics) सावेडी येथील गुलमोहोररोड पोलीस चौकी परिसरात वंचित बहुजन आघाडी प्रणित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार युवा मंचच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड आणि आरटीओ अधिकारी शंकर कराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
(Politics) कार्यक्रमात बोलताना वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी प्रस्थापित व्यवस्थेवर कडाडून प्रहार करत, “ज्या मनुस्मृतीने शूद्रांना शिक्षण नाकारले, त्याच व्यवस्थेला छेद देत महात्मा फुले यांनी क्रांतीची बीजे पेरली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचे संविधान देशाला दिले. त्यामुळे समतेचा विचार हाच आमच्यासाठी खरा सण आहे,”असे स्पष्ट केले.
(Politics) यावेळी ॲड. सुरेश लगड यांनी आपल्या प्रभावी भाषणातून संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “संविधान हे केवळ कागदावरील नियम नसून, ते कोट्यवधी शोषितांच्या अस्तित्वाचे आणि न्यायाचे अभेद्य सुरक्षा कवच आहे. आजच्या काळात कायद्याचे ज्ञान हेच सर्वात मोठे शस्त्र असून, युवकांनी संविधानाच्या आधाराने स्वतःला सक्षम करणे आवश्यक आहे. बाबासाहेबांनी आपल्याला याचिका नव्हे तर अधिकार दिले आहेत, ही जाणीव प्रत्येकाने ठेवावी.”
तसेच त्यांनी दुसऱ्या कार्यक्रमातील भाषणातही युवकांना मार्गदर्शन करत सांगितले की, “कायद्याची जाण आणि संविधानिक मूल्ये आत्मसात केल्याशिवाय समाजातील अन्यायाविरुद्धची लढाई अपूर्ण राहते. शिक्षण आणि कायद्याच्या बळावरच परिवर्तन घडू शकते, त्यामुळे युवकांनी अभ्यासू, सजग आणि जबाबदार नागरिक बनण्यावर भर द्यावा.”
आरटीओ अधिकारी शंकर कराळे यांनीही मार्गदर्शन करत, “बाबासाहेबांचे विचार आचरणात आणणे हीच खरी प्रगती आहे. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’ ही क्रांतीची हाक असून युवकांनी व्यवस्थेचे गुलाम न बनता ‘सिस्टम मेकर’ बनण्याचा प्रयत्न करावा,” असे आवाहन केले.
या कार्यक्रमासाठी बौद्धाचार्य दीपक पाटोळे, अशोक औटी, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, अमर निर्भवने, ॲड. लक्ष्मीकांत पठारे, सचिन ठोंबे, सावन मकासरे, अशोक देवडे यांची उपस्थिती होती.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार युवा मंचचे अध्यक्ष देविदास भालेराव, उपाध्यक्ष प्रतीक जाधव, किरण चव्हाण, शुभम जगदाळे, संतोष पवार, उमेश जाधव, पंकज पवार, सचिन पवार, दीपक जाधव, अंकुश माळसमिंदर, भरत दिघे, वैभव पवार, संकेत तिनपोले, जयदेश देठे, साहिल देठे, अक्षय देठे, प्रतीक साठे, हर्ष रणधीर, केदार बल्लाळ, रोहित गाडे, ओम गाडे, प्रेम साठे, वंदना साठे, पूजा भालेराव, अश्विनी जाधव, दिव्या दिघे, मुक्ता माळसमिंदर, नानू दासी, गौरव कसबे, खंडू पानमळकर, विजय मते आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी मंचचे अध्यक्ष देविदास भालेराव व उपाध्यक्ष प्रतीक जाधव यांनी उपस्थित मान्यवर, भीमसैनिक व पोलीस प्रशासनाचे आभार मानले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

