अहमदनगर | १६ ऑगस्ट | पंकज गुंदेचा
nation राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूलमध्ये ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. ढोलताशांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली. रस्त्यावर विद्यार्थी देशप्रेमाच्या घोषणा देत होते. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी प्रभातफेरीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
झेंडावंदनास प्रमुख पाहुणे म्हणून यश फौंडेशनचे अध्यक्ष मेजर संजय डोंगरे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डोंगरे यांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक जगन्नाथ बोडके यांनी प्रास्ताविक करून स्वातंत्र्यदिनाची माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्यांची देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमासाठी शिक्षक लोंढे, काळे, सकट, उकिरडे, काथवटे, घनवट, बोटे, बेडके, नन्नवरे, आठरे, चव्हाण, वाणी उपस्थित होते.
कृपया, बातमी वाचल्यानंतर कॉमेंटबॉक्समधे आपली प्रतिक्रिया नोंदवा
Read This : The Right to a Dignified Burial is Being Denied to Tribals in the Municipal Area
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.