Education: टंकलेखन परीक्षेत ‘लक्षदीप’चे यश

2 Min Read
SubEditor | Dipak Shirsath

शेवगाव | रयत समाचार

Education: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जानेवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय कॉम्प्युटर टायपिंग परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून शेवगाव येथील लक्षदीप कॉम्प्युटर टायपिंग व शॉर्टहॅण्ड इन्स्टिट्यूटने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेतून २२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी सुमारे ८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विशेष म्हणजे तालुक्यात सलग पाचव्यांदा सर्वाधिक विद्यार्थी प्रवेशाचे प्रथम क्रमांकाचे मानांकन या संस्थेने कायम ठेवले आहे. या निकालात संस्थेतील पहिल्या तीन क्रमांकांवर मुलींनीच बाजी मारत उल्लेखनीय कामगिरी केली.

निकालानुसार पातकळ अदिती संदीप हिने ९६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. गायकवाड प्रियंका अशोक हिने ९५ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. तर मुरदारे विद्या अशोक आणि काळे ममता अरुण यांनी ९४ टक्के गुण मिळवत संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला.

याशिवाय अभिषेक पवार, शितल म्हस्के, भक्ती सुरोसे, प्रिती जमधडे, चैतन्य गोयकर, अमृता गुगळे, दिव्यल गोरे, यश घुले आणि ओंकार बोरुडे या विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत विशेष यश मिळवले.

ऑब्जेक्टिव्ह विभागात २० विद्यार्थ्यांनी २५ पैकी २५ गुण मिळवले, तर स्पीड पॅसेजमध्ये पाच विद्यार्थ्यांनी ४० पैकी ४० गुण मिळवत संस्थेचा लौकिक वाढवला आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत आणि संस्थेचे संस्थापक प्राचार्य वैभव दत्तात्रय जगताप यांच्यासह विजय सुपारे, श्रीकांत शिंदे, भक्ती शिंदे, कावेरी कुऱ्हे आणि आरती शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

हे हि वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai

 

 

Share This Article