मुंबई | ४ ऑगस्ट | प्रतिनिधी
(Mumbai news) महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी एकत्र येत कार्टूनिस्ट कम्बाईन या संस्थेच्या अनधिकृत, अपारदर्शक आणि एकपक्षीय कारभाराचा निषेध नोंदवला आहे. या संस्थेने महाराष्ट्रातील सर्व व्यंगचित्रकारांचे प्रतिनिधित्व केल्याचा खोटा दावा करत कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
(Mumbai news) आज शिवसेना नेते सुभाष देसाई यांना व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध व्यंगचित्रकारांच्या सह्यांचे पत्र सादर करण्यात आले. या पत्रात संस्थेची विद्यमान कार्यकारणी तात्काळ बरखास्त करून ती नव्याने रजिस्टर करून, संस्थेचा कारभार लोकशाही मार्गाने, सर्वसमावेशक आणि पारदर्शक रितीने चालवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
(Mumbai news) गौरव सर्जेराव म्हणाले की, “या विषयावर सुभाष देसाई यांच्याशी सखोल चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.”
हा एक प्रकारे महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांच्या आत्मसन्मानाची लढाई असून, कार्टूनिस्ट कम्बाईनसारख्या बंदिस्त व अपारदर्शक संस्थांच्या विरोधात कलावंत एकत्र येत आहेत, हे निश्चितच स्वागतार्ह पाऊल आहे.
हे ही वाचा : साप्ताहिक ई- मार्मिक

