Literature | गणेश घुले लिखित ‘झाड’ कादंबरीचे 10 मार्च रोजी प्रकाशन; प्रॉमिथिअस बुक्स प्रकाशन संस्थेचे पहिले पुस्तक

रयत समाचार वृत्तसेवा
1 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

छत्रपती संभाजीनगर | ६.३ | रयत समाचार

(Literature) साहित्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी म्हणजे लेखक गणेश घुले लिखित ‘झाड’ या किशोर कादंबरीचे प्रकाशन मंगळवारी, ता.१० मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. प्रॉमिथिअस बुक्स या नव्या प्रकाशन संस्थेच्या पहिल्याच पुस्तकाचा हा प्रकाशन सोहळा असून त्यामुळे साहित्यविश्वात नव्या प्रवासाची सुरुवात होत आहे, अशी माहिती प्रमिला माया नारायण आणि राहुल कोसंबी यांनी दिली.

(Literature) औरंगपूरा स.भू. परिसरातील गोविंदभाई श्रॉफ ललित कला अकादमी सभागृह येथे होणाऱ्या या कार्यक्रमात प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमास दासू वैद्य आणि अरविंद जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

(Literature) लेखक गणेश घुले यांनी किशोरवयीन वाचकांसाठी लिहिलेली ‘झाड’ ही कादंबरी संवेदनशील विषय मांडणारी असून तिच्या मुखपृष्ठाची रचना शशी शेटे यांनी केली आहे. नव्या प्रकाशन संस्थेच्या पहिल्या पुस्तकामुळे या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

हा कार्यक्रम बालकुमार फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून साहित्यप्रेमी, लेखक, वाचक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading