अहमदनगर | १२ मार्च | प्रतिनिधी
(Latest news) शहरात अनेक वर्षांपासून ‘भुखंड तस्कर’ व ‘टुकार’ लोकल पुढाऱ्यांच्या पंटरांकडून अनेक सभ्य गृहस्थांच्या प्रॉपर्टीवर ‘ताबेमारी’ सुरू आहे. अनेकजण यात होरपळले आहेत. अनेकांनी वैतागून यांनाच प्रॉपर्ट्या कवडीरेवडी भावात विकल्या. काहींच्या परस्पर ‘लुच्ची’ माणसे उभ्या करून खोट्या खरेदी केल्या. यासाठी एकच उदाहरण पुरेसे आहे. अहमदनगरचे ‘कलावैभव’ असलेले महान चित्रकार अर्जूनराव शेकटकर हे रचना कला महाविद्यालयाचे संस्थापक. ते फार मोठे व प्रसिद्ध चित्रकार आहेत. त्यांचा वडगाव गुप्ता भागात साळी समाजबांधवांनी एकत्र येवून केलेला लेआऊट आहे. येथे शेकटकर सरांचा प्लॉट आहे. त्यांचे निधन झाल्यानंतर काही वर्षांनी एका ताबेमारी करणाऱ्या भामट्या टोळीने शेकटकर सरांच्या जागेवर श्रीगोंद्याचा तोतया, भामटा इसम उभा करून त्या प्लॉटची खरेदी केली. त्यावर ताबा मारला आणि तो प्लॉट मार्केटमधे विक्रीला काढला. ही गोष्ट त्यांचे चिरंजीव यांना समजल्यावर त्यांनी पोलिस कंप्लेंट केली. आता त्यावर पुढील करवाई सुरू आहे.
(Latest news) दरम्यान अहमदनगर नागरिक मंच या संघटनेने असे ताबेमारी झालेले अनेक अन्यायग्रस्त एकत्र करून २५ जानेवारी रोजी पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांना अशा प्रकरणांमधे सामान्य माणसांना पोलिस संरक्षणासह मदत देण्याची मागणी केली. यावर मंत्री विखे पाटील यांनी सकारात्मक पावले उचलत दोन्ही अधिकारी यांना सामान्य लोकांना मदत करण्याचे निर्देश दिले.
(Latest news) हे प्रकण ताजे असताना आता तर चक्क महानगरपालिकेच्या भुतकरवाडी ‘पंपिंग स्टेशन’ येथील आयुक्तांच्या नावावर असलेल्या जमिनीवर ‘ताबेमारी’ करण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे. थेट वसंतटेकडी येथून गुलमोहर रोड, कुष्ठधाम परिसर, जुने दत्तमंदिर परिसर, मनमाडरोड, धर्माधिकारी मळा असे वाहत येणारा नैसर्गिक वाहता ओढा माती, रॅबिट, कचराकबाड टाकत बुडवुन टाकण्याचे काम सुरू आहे. पंपिंग स्टेशन या मनपाच्या जागेत माती, रोडाराडा, मुरूम आणून टाकला आहे. हे सर्व सुरू असताना या भागातील महानगरपालिकेचे ‘केअर टेकर’, पाणीपुरवठा अधिकारी डोळेझाक करून आहेत.
अहमदनगर बरो म्युनिसिपालटीने १९५४-५५ साली सावेडी पाणीपुरवठा योजना सुरू केली. त्यावेळी किसनसिंग गोविंदसिंग परदेशी हे अध्यक्ष होते तर मुंबई सरकारचे मुख्य अभियंता एस.ई. वाडिया यांच्या देखरेखीखाली हे काम १.५.१९५४ साली पुर्ण झाले. त्यासाठी २,८८०,३८/- खर्च आला यामधे लगतची उपसा विहीर व इंजिनघरचा समावेश होता. या योजनेसाठी धर्माधिकारी कुटुंबियांची शेतजमिन आरक्षण करून ताब्यात घेतली होती.
शहराची लोकसंख्या वाढून पुढे नवनविन पाणी योजना झाल्या. जाधवमळा ‘पंपिंग स्टेशन’, पिंपळगाव माळवी धरण पंपिंग स्टेशन आणि सर्वात शेवटी मुळाडॅम पंपिंग स्टेशन. त्यामुळे आता जुन्या योजनांच्या जागा व प्रॉपर्टीवर ‘भुखंड तस्कर’ यांचा डोळा आहे. त्यासाठी काही अधिकारी यांना हाताशी धरून वेगवेगळे अहवाल तयार करून. या जागेची मनपाला गरज नाही, असे दाखवून या जागा भुखंड तस्करांच्या घशात घालण्याचा ‘चालू’ असलेला डाव थांबविला पाहिजे. खुद्द मनपाच्या जागेवरील अतिक्रमणासह होत असलेली ‘ताबेमारी’ थांबविली पाहिजे.
शहरात सर्वत्र स्वच्छता करत फिरणारे, रस्त्याच्या कडेला पोट भरणाऱ्यांवर अतिक्रमण मोहिम राबविणारे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांचेही या अतिक्रमणाकडे दूर्लक्ष होत आहे. एकतर त्यांना हा ‘उद्योग’ माहिती नाही किंवा त्यांच्याकडे कोणीच तक्रार केलेली नाही. आयुक्त डांगे यांनी आजच येथे भेट देवून हे ‘अतिक्रमण’ ‘ताबेमारी’ काढावी. नैसर्गिक वाहत्या ओढ्यात टाकण्यात येणारे साहित्य जप्त करावे. ओढा वाचवावा. संबंधितांवर गुन्हे दाखल करून महानगरपालिकेची प्रॉपर्टी वाचवावी.
हे ही पहा : अहिल्यानगरमधे ‘ह्युमन राईट व्हायलेंस’ जिल्हाधिकारी आशिया यांनी बोगस लेआऊट तात्काळ रद्द करावा