श्रीरामपूर | २८ जानेवारी | सलीमखान पठाण
(latest news) नगरपालिकेने सात दिवसापूर्वी दिलेल्या नोटिसीची मुदत संपल्यानंतर आज सकाळी साडेदहा वाजता नगरपालिकेचे अतिक्रमणविरोधी विभागाने मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, अतिक्रमण अधिकारी संजय शेळके, नगर अभियंता सूर्यकांत गवळी आदींच्या फौज फाट्यासह बेलापूर रोडपासून रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात लोकांच्या मालमत्तेची नासधूस झाल्याचे दिसून आले.
(latest news) मोहीम राबविताना पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला. श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे व शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष कृती दलाच्या तुकडीसह महिला पोलीसही यामध्ये सहभागी झाले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने कोणीही फारसा प्रतिकार केला नाही. दोन जेसीबी, फायर फायटरची गाडी आणि इतर नगरपालिकेचा स्टाफ यांच्या सहकार्याने ही अतिक्रमण मोहीम राबविली जात आहे. यावेळी रस्त्यावर बघ्यांची खूप मोठी गर्दी झाली.
बेलापूररोडला पश्चिम बाजूने ही मोहीम सुरू झाल्यानंतर पूर्वेकडील लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपली अतिक्रमणे काढायला सुरुवात केली. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पत्र्याचे शेड, दुकाने पुढे आल्याचे दिसून आले. अनेकांनी आपले सामान हलवण्यासाठी पूर्ण कुटुंब रस्त्यावर उतरवल्याचेही दिसत आहे.
अतिक्रमण मोहीम थांबवावी किंवा दुकानदारांचा सहानुभूतीने विचार करावा यासाठी शहरातील राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्याकडे जाऊन साकडे घातले. आमदार हेमंत ओगले, माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत विनंती केली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शासन नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिल्याने पूर्वनियोजित ‘कार्यक्रमा’नुसार ही मोहीम राबविली जात आहे.
ही मोहीम सुरू राहणार असून नागरिकांनी आपापली अतिक्रमणे काढून घेऊन आपले नुकसान टाळावे व नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले.
हे ही वाचा : Religion: गोरक्षनाथ मराठी होते काय ? – टी. एन. परदेशी
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.