(India news) येथील रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची बैठक आज ता.१२ रोजी छत्रपती शिवाजी कॉलेज येथे पार पडली. बैठकीत संस्थेने ‘रयत’ मासिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. ते म्हणाले, जेणेकरून शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, साहित्य, क्रीडा, सामाजिक, कला, संस्कृती, जागतिक घडामोडी वगैरे वैविध्यपूर्ण व माहितीपूर्ण लेख समाविष्ट केले जातील व त्याचा प्रसार होईल.
(India news) याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, आयओटी, रोबोटिक्स, थ्री.डी. प्रिंटिंग या विषयांचा अभ्यासक्रम संस्थेच्या सर्व शाखांमध्ये सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच याविषयीचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सातारा येथे सुरू करण्याचाही निर्णयामुळे घेण्यात आला.