India news | नगरी पोलीस अधिकाऱ्याने गाजवली दिल्ली ‘सीआरपीएफ’ परेड; महेश जंजिरे यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांसमोर केले शानदार संचलन

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

नवीदिल्ली | २२.४ | रयत समाचार

(India news) येथील गुरुग्राममधील केंद्रीय राखीव पोलीस दल अकादमीत ‘सीआरपीएफ’मधील असिस्टंट कमांडंट पदाचे एक वर्षाचे अत्यंत खडतर असे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४६ अधिकाऱ्यांना ता. २२ एप्रिल रोजी दीक्षांत समारंभात देशसेवेची शपथ देण्यात आली. यावेळी झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये श्रीगोंदा येथील महेश जंजिरे यांनी शानदार संचालन करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

(India news) परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजयकुमार यांच्यासह ‘सीआरपीएफ’चे विशेष महानिरीक्षक जकी अहमद, अकादमीचे संचालक अमितकुमार यांच्यासह ‘सीआरपीएफ’चे अधिकारी, महेश शिंदे यांच्यासह प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ४६ असिस्टंट कमांडंट अधिकाऱ्यांचे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते.

(India news) अहिल्यानगर येथील महेश जंजिरे यांनी एक वर्षाच्या कठोर आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणानंतर असिस्टंट कमांडंट म्हणून उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले.
त्यांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

India news

महेश जंजिरे यांच्या या यशामुळे अहिल्यानगरसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या या यशाने यूपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना प्रेरणा मिळत आहे.
दीक्षांत समारंभासाठी महेश जंजिरे यांचे वडील ईश्वर जंजिरे, आई सुनीता जंजिरे, पत्नी वास्तुविशारद काजल दरेकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील दरेकर, अश्विनी दरेकर, ॲड. सविता बोठेपाटील यांच्यासह अहिल्यानगर व श्रीगोंदा येथील विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.
युपीएससी परीक्षेत मराठी तरुणांचा टक्का वाढण्यासाठी मदतीची तयारी- महेश जंजिरे
महेश जंजिरे यांनी यावेळी सांगितले की, युपीएससीमध्ये मराठी टक्का वाढायला हवा. मराठी मुलांमध्ये युपीएससी परीक्षेबाबतची विनाकारण असलेली भीती व न्यूनगंड दूर करुन त्यांच्यात अभ्यासाची जिद्द व प्रशासनात अधिकारी होण्याची उर्मी निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी तसेच शिस्तबद्ध अभ्यासासाठी महाराष्ट्रातील इच्छुक तरुणांना मदत करण्याची आपली तयारी आहे, असे महेश जंजिरे यांनी सांगितले. त्यांच्या या भूमिकेचे दीक्षांत समारंभाला उपस्थित मराठी मंडळींनी जोरदार स्वागत करुन त्यांचे अभिनंदन केले.

 


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading