अहमदनगर | १७ जुलै | प्रतिनिधी
(India news) पुढील ५०% मिळवण्यासाठी अजून प्रयत्न करावे लागतील, पण आतापर्यंत मिळालेलं यश हे उत्साहवर्धक आहे, असे मत नगर अर्बन बँक बचाव समितीचे शिलेदार व माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी मुंबईतील ‘प्रवर्तन निदेशालय’ (Enforcement Directorate) कार्यालयासमोर व्यक्त केले. ता. १६ जुलै रोजी गांधी यांना मुंबईतील झोन-II, ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
(India news) गांधी यांची सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत तब्बल १० तास मॅरेथॉन चौकशी झाली. “ईडीचे तीन अधिकारी माझ्याशी सतत प्रश्न विचारत होते, पण मी प्रत्येक मुद्द्यावर स्पष्ट आणि पुराव्यांसह उत्तर दिली. मी २००८ पासून बँकेशी जोडलेलो असल्याने माझ्या मनात प्रत्येक घडामोड स्पष्ट आहे, असे गांधी यांनी सांगितले.
(India news) ते पुढे म्हणाले, माझ्याकडे कोणत्याही कागदपत्राची गरज पडली नाही. मी जेव्हा खरे बोलत होतो, तेव्हा चौकशीतील अधिकारीही समाधानी होते. ईडी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून काम करते. खोटं बोलणाऱ्याला लगेच ओळखतात. त्यामुळे काही लपवण्याचा प्रश्नच नाही.

