India news | ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट’ अनुभवण्याची संधी; महापरिनिर्वाण दिनानिमित्त पर्यटन विभागाचा पुढाकार

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
उपसंपादक | दिपक शिरसाठ

मुंबई | गुरूदत्त वाकदेकर

(India news) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट’चे आयोजन करण्यात आले. चैत्यभूमीला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी ही टूर सर्किट पूर्णपणे निःशुल्क ठेवण्यात आली आहे. या उपक्रमाद्वारे पर्यटकांना डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणादायी कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.

(India news) पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले, हा सर्किट केवळ पर्यटनाचा नाही, तर तो भारतीय लोकशाहीच्या पायाचे दिग्दर्शन करणारा प्रवास आहे. डॉ. आंबेडकरांच्या विचारांना आणि सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याला हे अभिवादन आहे.

(India news) या टूर सर्किटमध्ये मुंबईतील प्रमुख आंबेडकरी स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात चैत्यभूमी, राजगृह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स कॉलेज (वडाळा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन तसेच परळ येथील बीआयटी चाळ, सिद्धार्थ कॉलेज आणि फोर्ट परिसराचा समावेश आहे. या सर्व स्थळांवरून डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक समता, शिक्षण आणि संविधाननिर्मितीतील योगदान पर्यटकांना अनुभवता येईल.

संचालनालयाने या सर्किटद्वारे इतिहास, संस्कृती आणि सामाजिक परिवर्तनाचा धागा एकत्र आणला आहे. दररोज तीन बसेस या टूरसाठी उपलब्ध असतील. सहभागी पर्यटकांना निःशुल्क प्रवास, मार्गदर्शक आणि अल्पोपहार यांची सुविधा पुरवली जाईल. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर नोंदणी होणार आहे.

या प्रेरणादायी प्रवासाची सुरूवात ता.३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता वीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क (गणपती मंदिरासमोर) येथून होईल. सहलीचा समारोप चैत्यभूमी, दादर येथे करण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी सूरज चतुर्वेदी ८१०८१७५५३०, पवन पवार ७६६६६०३२११, पर्यटन संचालनालय चॅटबोट क्र. ९९९३३०८८८३ यांना संपर्क साधावा.


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading